Viral: भावा मानलं तुला! बॉसने अचानक सुट्टी रद्द केली अन् त्याने थेट नोकरीच सोडली; मेसेज होतोय व्हायरल

बॉसने सुट्टी रद्द केल्यामुळे एका कर्मचाऱ्याने चक्क नोकरी सोडल्याचा प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियातील हा प्रकार असून बॉस आणि कर्मचाऱ्यांमधील टेक्स्ट मेसेज व्हायरल होत आहेत.
Man Quits Job
Man Quits Job
Updated on

नवी दिल्ली- बॉसने सुट्टी रद्द केल्यामुळे एका कर्मचाऱ्याने चक्क नोकरी सोडल्याचा प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियातील हा प्रकार असून बॉस आणि कर्मचाऱ्यांमधील टेक्स्ट मेसेज व्हायरल होत आहेत. बॉस नीक आणि कर्मचारी नोईल यांच्यामधील संवाद वाचण्यासारखा आहे. बॉस कोणतीही कल्पना न देता कर्मचाऱ्याची नियोजित सुट्टी रद्द करतो. एका कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्याने त्याला बदली कर्मचारी येईपर्यंत सुट्ट्या पुढे ढकलण्याचा निर्णय बॉसने घेतलेला असतो.

कर्मचारी आपल्या बॉसला मेसेज रिप्ले करतो की, माझ्याशी कोणतीही चर्चा न करता सुट्टी रद्द करणे योग्य नाही. मी सात महिन्यांपूर्वीच सुट्टी घेणार असल्याचं सांगितलं होतं. माझ्या भावाचे बालीमध्ये लग्न आहे. सर्व तिकीट बुक झाले आहेत. माझ्या परिवासोबत मी तीन आठवड्यांसाठी तिथे जाणार आहे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला सुट्ट्या घ्याव्याच लागणार आहेत.

Man Quits Job
Viral Video : कोण आहे 'ही' ओळखा पाहू? एकेकाळी सलमानच्या हिट चित्रपटाची होती नायिका!

बॉस यावर उत्तर देतो की, 'कर्मचारी सोडून गेल्याने कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे तू तीन दिवसांची सुट्टी घे. शिवाय तू तीन आठवड्याची सुट्टी घेऊन बालीमध्ये काय करणार आहेस?' कंपनी सध्या अडचणीत आहे हे मला मान्य आहे. पण मी माझी सुट्टी रद्द करु शकत नाही. मी तीन वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि मी माझी सुट्टी कशी घालवतो हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे, असं उत्तर कर्मचारी देतो.

कंपनीने तात्पुरत्या काळासाठी कंत्राटी कर्मचारी घ्यावा किंवा कर्मचाऱ्यांकडून ओव्हर टाईम करुन घ्यावं. पण, मला माझ्या सुट्ट्या कमी किंवा रद्द करता येणार नाहीत, असं कर्मचारी स्पष्ट सांगतो. त्यानंतर बॉस कर्मचाऱ्याला थेटच सांगतो की, तुझ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात, माफ कर, पण तुला कामावर यावच लागेल.

viral SMS
viral SMS
Man Quits Job
Domino's Viral Video: डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याने आधी नाकात बोट घातले अन् नंतर...; किळसवाणा व्हिडिओ व्हायरल

सुट्टी मिळणार नसेल तर मी उद्यापासूनच सुट्टी घेत आहे. मी राजीनामा देतो. अशा कंपनीमध्ये मला देखील राहायची इच्छा नाही, असं म्हणत कर्मचारी कंपनी सोडत असल्याचं बॉसला शेवटच्या मेसेजमध्ये सांगतो. बॉस-कर्मचाऱ्यामधील हे टेक्स्ट मेसेज व्हायरल होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी कर्मचाऱ्याची बाजू घेतली आहे. शिवाय कुटंबापेक्षा कामाला महत्व देणाऱ्या ब़ॉसला सुनावलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.