ब्रिटनमध्ये मोठ्या लॉटरी जिंकणाऱ्या लॉटरी विजेत्याचा शोध सध्या घेतला जात आहे. पण तो सापडत नाहीये. एका व्यक्तीने १० लाखांहून अधिक रुपयांचं युके नॅशनल लॉटरी मेगा बक्षीस जिंकलं आहे. या लॉटरी विजेत्याला ३० वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला १० लाख रुपये दिले जातील.
यूकेच्या मेट्रोच्या अहवालानुसार, यूके नॅशनल लॉटरीने सेट फॉर लाइफच्या खेळाडूंना त्यांची तिकिटे तपासण्याचं आवाहनही केलं आहे. याचं कारण म्हणजे ज्या माणसाला ही लॉटरी लागली आहे, त्याला आपल्याला लॉटरी लागल्याचं माहित नाही. (UK Lottery Winner of 10 lakhs rupees per month gone missing)
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, लिंकनशायरच्या दक्षिण हॉलंड जिल्ह्यातील लॉटरीच्या तिकिटाच्या अज्ञात विजेत्याला बक्षीसावर दावा करण्यासाठी २ डिसेंबरपर्यंत वेळ आहे. ५ जून रोजी याचा लकी ड्रॉ काढण्यात आला.
लॉटरीचं हे तिकीट हरवलं जरी असेल तरी ज्या व्यक्तीला ते मिळालं आहे किंवा ज्याने ते जिंकलं आहे, त्यांनी लिखित स्वरुपात कंपनीला कळवावं. पण सोडतीच्या ३० दिवसांच्या आत हे करणं आवश्यक आहे. यूके नॅशनल लॉटरी आयोजकांनीही ग्राहकांना त्यांची तिकिटं पुन्हा तपासण्याचं आवाहन केलं आहे.
द नॅशनल लॉटरीचे वरीष्ठ सल्लागार एंडी कार्टर म्हणाले की आम्ही या गुढ तिकीटधारकाला शोधत आहोत. तसंच त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासही उत्सुक आहोत. ही लॉटरी त्या व्यक्तीचं आयुष्य आमुलाग्र बदलणार आहे. आयोजक सांगतात की ही लॉटरी ज्याला कोणाला मिळेल त्याला पुढच्या ३० वर्षांसाठी दरमहा १० लाख रुपयांहूनही अधिक रक्कम मिळणार आहे. फक्त ज्या कोणाकडे हे लकी तिकीट असेल, त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपल्या बक्षिसावर दावा सांगावा.
लॉटरी आयोजकांचं म्हणणं आहे की ज्या लोकांनी लॉटरीची तिकिटं घेतली आहेत, त्यांनी आपली जुनी तिकिटंही तपासावीत. कपड्यांचे खिसे, पर्स, बॅग्ज या गोष्टीही तपासण्याचं आवाहन या कंपनीने केलं आहे.
यापूर्वीही अशा प्रकारची लॉटरी काही जणांना लागली आहे. मार्चमध्ये सेट फॉर लाईफ ड्रॉ एका बिल्डरने जिंकलं होतं. ५० वर्षीय बिल्डर पॉल बेवंस यांना ३० वर्षांसाठी प्रति महिना १० हजार युरोज असं बक्षीस लागलं होतं. आपल्याला विश्वासच बसत नव्हता म्हणून आपण हे तिकीट वारंवार तपासत होतो, असंही पॉल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.