मॅनेजरने सिक लिव्ह दिली नाही, नोकरी जाण्याच्या भीतीने कामावर आली अन् सगळंच संपलं

Office Work Load News: एका महिला कर्मचाऱ्याला आजारी असल्याने दोन दिवसांची सिक लिव्ह हवी होती, पण मॅनेरजने तिला सुट्टी नाकरली. त्यामुळे ती कामावर आली अन् कामावर असतानाचा तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Office Work
Office Work
Updated on

नवी दिल्ली- कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील एका महिलेचा जीव गेल्याचा दावा करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. एका महिला कर्मचाऱ्याला आजारी असल्याने दोन दिवसांची सिक लिव्ह हवी होती, पण मॅनेरजने तिला सुट्टी नाकरली. त्यामुळे ती कामावर आली अन् कामावर असतानाचा तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

थायलँडच्या सुखोथाई प्रांतातील हा प्रकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कामावर आल्यानंतर बेशुद्ध झाली होती. त्यानंतर काही काळाने तिचा मृत्यू झाला आहे. महिलेचे वय ३० वर्षे होते. महिला एका इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये कामाला होती. महिलेच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, तिने आजारी असल्याने मॅनेजरला सुट्टी मागितली होती. पण, तिला सुट्टी नाकारण्यात आली.

Office Work
HC scraps IT rules: कुणाल कामराचा दणका! हाय कोर्टाने आयटी नियमावलीतील दुरुस्ती केली रद्द, आतापर्यंत काय-काय घडलं?

कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, महिला कर्मचाऱ्याने ५ ते ९ सप्टेंबरदरम्यान मेडिकस सर्टिफिकेट देऊन सुट्टी घेतली होती. तिच्या मोठ्या आतड्यांमध्ये सूज आली होती. त्यामुळे तिला चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं होतं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तिची तब्येत सुधारली नव्हती. त्यामुळे तिने दोन दिवस आणखी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.

महिला कर्मचाऱ्याने १२ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर असे दोन दिवस सुट्टी मागितली. पण, मॅनेजरने सांगितलं की, तू याआधीच खूप सुट्टी घेतली आहे. त्यामुळे तू ऑफिसला येऊन आधी मेडिकल सर्टिफिकेट देऊन जा. नोकरी जाण्याच्या भीतीने ती कामावर हजर झाली. मित्रांनी सांगितल्यानुसार, तिची तब्येत ठीक नव्हती. २० मिनिटे काम केल्यानंतर ती अचानक जमिनीवर कोसळली.

Office Work
Viral Video: डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेत तरुणीचा डान्स; सोशल मीडियावर चर्चेला फुटलं तोंड; पाहा व्हिडिओ

महिला कर्मचाऱ्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढच्या दिवशी महिलेला मृत घोषित करण्यात आले. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने यापूर्वी कधीही सिक लिव्ह घेतली नव्हती. याप्रकरणी कंपनीने फेसबुक पोस्ट करून महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, सदर प्रकारामुळे सोशल मीडियावर चर्चांना तोंड फुटलं आहे. महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.