Marburg Virus : कोरोनानंतर मारबर्ग व्हायरसने वाढवली चिंता, जाणून घ्या, लक्षणं अन् उपाय

नव्या विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही अलर्ट जारी केला आहे.
various
various Sakal
Updated on

Marburg Virus Update : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून जग अद्याप पूर्णपणे बाहेर आलेले नाहीये. त्यात आता आणखी एका नव्या विषाणूने जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगातील बहुतांश देशांना आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. त्यानंतर आता कुठे नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती त्यात आता मारबर्ग या नवीन विषाणूने अनेक देशांची चिंता पुन्हा वाढली आहे. नव्या विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही अलर्ट जारी केला आहे. मारबर्ग विषाणूबाबत (Marburg Virus) त्वरित खबरदारी न घेतल्यास या विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते असे मत डब्ल्यूएचओने व्यक्त केले आहे. (Marburg Virus News In Marathi)

various
आरबीआयचा महाराष्ट्रातील बँकेला दणका; काढता येणार केवळ 15 हजार

मारबर्ग व्हायरस काय?

मारबर्ग विषाणू हा कोरोनासारखाच वटवाघळांमुळे होणारा आजार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित प्राण्यापासून मानवांना लागण होते. त्यानंतर त्याचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो. हा विषाणू देखील इबोला श्रेणीतील एक प्रकार असून, याचा संसर्ग इबालोपेक्षा वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. 1967 मध्ये या विषाणूचा पहिला प्रादुर्भाव जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्टमध्ये दिसून आला होता. मारबर्ग व्हायरसमुळे घानामध्ये गेल्या महिन्यात 2 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्काय न्यूजने दिले आहे.

various
भारतीय वंशाचे ऋषी सुनक मजबूत स्थितीत, तिसऱ्या फेरीत 115 मतांसह आघाडीवर

मारबर्ग व्हायरस रोगाची लक्षणे

मारबर्ग व्हायरसने ग्रस्त व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यासाठी 2-21 दिवस लागतात. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि मायल्जिया यांसारखी लक्षणे संक्रमित रुग्णामध्ये दिसू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते असे तज्ञांचे मत आहे.

मारबर्ग व्हायरस कसा पसरतो?

या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव जसे की लघवी, लाळ, घाम, विष्ठा, उलट्या इत्यादींच्या संपर्कात आल्याने याचा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरू शकतो. इतकेच नाही तर, संक्रमित व्यक्तीचे कपडे आणि बिछाना वापरल्यानेही संसर्ग पसरण्याचा धोका आहे.

various
दिलासादायक! दोन दिवसांत होणार कोरोना विषाणू नष्ट; Glenmarkचं नवं संशोधन

रोग प्रतिबंध आणि उपचार

मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार म्हणून, त्याला द्रव आहार आणि इलेक्ट्रोलाइट्सवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ऑक्सिजन आणि रक्तदाब स्थिती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय संक्रमित व्यक्तींशी इतरांनी थेट संपर्क टाळावा. जर कुणाला या विषाणूची लागण झाल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनी सुरक्षेसाठी हातमोजे आणि मास्क घालणे आवश्यक आहे. संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंपासून लांब राहणे बचावासाठी फायदेशीर ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.