Hottest Month: गेल्या 10 महिन्यांत मार्च ठरला सर्वात उष्ण महिना; काय आहे तापमान वाढीचे कारण

Global Warming: जलद तापमानवाढीमागील कारण मानव निर्मित हरितगृह वायू आहेत. तापमान वाढवणाऱ्या इतर घटकांमध्ये एल निनोचा समावेश होतो.
Hottest Month
Hottest MonthSakal
Updated on

March Becomes Hottest Month In Year:

युरोपियन युनियनच्या हवामान बदल देखरेख सेवेने मंगळवारी सांगितले की, जगाने नुकतेच आतापर्यंतचा सर्वात उष्ण मार्च अनुभवला. यामध्ये 10-महिन्यांच्या उष्णतेचा अभ्यास केला ज्यामध्ये प्रत्येक महिन्याने नवीन तापमानाचा विक्रम केल्याचे समोर आले.

EU च्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (C3S) ने मासिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, मागील 10 महिन्यांपैकी प्रत्येक नव्या महिन्याने मागील महिन्यात उष्णतेचे रेकॉर्ड मोडले. तसेच यामध्ये मार्च हा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवण्यात आला.

सी3एस चे उपनिर्देशक समान्था बर्गेच म्हणाल्या की, उष्णतेचे हे जे काही विक्रम होत आहेत ते सामान्य नाहीत. ते चिंतेत टाकणारे आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, हा अभ्यास करताना 1940 पासून आतापर्यंतची आकडेवारी तपासली असता असे समोर आले की, तेव्हापासून आतापर्यंत यंदाच्या वर्षातील मार्च सर्वाधिक उष्ण महिना ठरला. दुसरीकडे 1850 नंतर 2023 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

Hottest Month
Tesla Autopilot: टेस्लाने अखेर नमतं घेतलं! ऑटोपायलट मोडवर अपघातात मृत्यू, भरपाई मागणाऱ्या पीडिताच्या कुटुंबियांशी तडजोड

"तापमानवाढीचे मुख्य कारण जीवाश्म इंधन उत्सर्जन आहे," असे इम्पीरियल कॉलेज लंडनच्या ग्रँथम इन्स्टिट्यूटचे हवामान शास्त्रज्ञ फ्रेडरिक ओटो म्हणाले.

हे उत्सर्जन कमी करण्यात अयशस्वी झाल्यास ग्रहाच्या तापमानवाढीला चालना मिळेल, परिणामी अधिक तीव्र दुष्काळ, आग, उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टी होईल, ओटो म्हणाले.

Hottest Month
Indian Students In US: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

कशामुळे वाढली उष्णता?

पावसाअभावी ॲमेझॉनच्या जंगलात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर जानेवारी-मार्चमध्ये व्हेनेझुएलातील जंगलातील आगीने विक्रम मोडले. दक्षिण आफ्रिकेत दुष्काळाने पिके नष्ट केली आणि लाखो लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला.

C3S ने म्हटले आहे की, जलद तापमानवाढीमागील कारण मानव निर्मित हरितगृह वायू आहेत. तापमान वाढवणाऱ्या इतर घटकांमध्ये एल निनोचा समावेश होतो. डिसेंबर-जानेवारीमध्ये एल निनोचा उच्चांक होता आणि आता तो कमजोर होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()