नवी दिल्ली - पाकिस्तानची स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे. देशभरातील नागरिक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पंतप्रधान शहाबाज यांच्यासह त्यांचं संपूर्ण मंत्रीमंडळ जगभरातील विविध देशांकडे आर्थिक मदतीची याचना करत आहे.
दरम्यान शहाबाज यांचा गट पाकिस्तानच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी इम्रान खान यांना जबाबदार धरत आहे. पीटीआय प्रमुख इमरान खान यांच्यावर नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी निशाणा साधला आहे.
मरियम यांनी इम्रान यांच्या बाजवा यांच्यासंदर्भातील वक्तव्यावर निशाणा साधला, इम्रान यांनी बाजवा यांना 'सुपर किंग' म्हटले होते. त्यावर मरियम म्हणाल्या, "जर जनरल बाजवा त्यावेळी 'सुपर किंग' होते, तर तुम्ही (इमरान खान) त्यांचे नोकर होता का? त्यांना पाकिस्तानला श्रीलंका बनलेले पाहायचे होते.
जनरल (निवृत्त) बाजवा यांनी आपले सरकार पाडण्याचे काम केल्याचा आरोप इम्रान यांनी केला होता. इम्रानच्या या वक्तव्यावर मरियम यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “सरकार पाडल्यानंतरही पीटीआय प्रमुख माजी लष्करप्रमुखांसोबत बैठका घेत राहिले. तुम्ही (इमरान खान) पूर्वी म्हणायचे की जनरल (निवृत्त) बाजवा यांच्याइतकी मला कोणीही मदत केली नाही. ज तुम्ही म्हणता की कमर जावेद बाजवा यांनी माझे सरकार पाडले.
इम्रान खान यांनी दावा केला की माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची इच्छा होती की त्यांनी युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाचा निषेध करावा, परंतु त्यांनी भारताचे उदाहरण देत तसे करण्यास नकार दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.