काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आता काश्मीरवर ताबा मिळवण्याची स्वप्ने रंगवू लागली आहेत. यासाठी ते बरीच तयारी करताना दिसून येत आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहरने अफगाणिस्तानमधील कंदाहारमध्ये जाऊन तालिबानी नेतृत्वाची यासंदर्भात भेट घेतली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना मसूद अजहर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कंदाहारमध्ये होता. यावेळीच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या मसूदने काश्मीरवर आपला ताबा मिळवण्यासाठी तालिबानकडून मदत मागितली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अजहरने तालिबानच्या राजकीय आघाडीचे प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर यांची भेट घेतली आहे. काश्मीरवर आपला ताबा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्याने ही भेट घेतल्याचं समजतंय. अलिकडेच मसूद अजहरने अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपला ताबा प्रस्तापित केल्यानंतर आनंद व्यक्त केला होता.
मसूद अजहरला इंडियान एअरलाईन्सच्या फ्लाईट आयसी-814 मधील प्रवाशांच्या सुरक्षेखातर भारतीय तुरुंगातून मुक्त करण्यात आलं होतं. या विमानाचं अपहरण पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलं होतं. काठमांडूमधून लखनऊकडे जाताना या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर या विमानाला अफगाणिस्तानमधील कंदाहारमध्ये नेलं होतं, ज्यावेळी तिथे तालिबानची सत्ता होती. त्यावेळी या प्रवाशांच्या सुटकेसाठी मसूद अजहरला सोडून द्यावं लागलं होतं. 1999 मध्ये त्याची सुटका झाल्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या स्थापनेपासूनच काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.