Kuwait Building Fire : कुवेतमध्ये अग्नितांडव; ४९ मृतांमध्ये बहुतांश भारतीय

कुवेतमधील अल अहमदी जिल्ह्यात आज सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला.
fire breaks out in a building in Kuwait
fire breaks out in a building in Kuwaitesakal
Updated on

दुबई - कुवेतमधील अल अहमदी जिल्ह्यात आज सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये किमान ४२ जण भारतीय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.

अल अहमदी जिल्ह्यातील मंगाफ शहरात आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीत किमान दोनशे जण होते. हे सर्वजण एकाच कंपनीत काम करणारे कर्मचारी असून त्यांच्यात अनेक जण भारतीय आहेत. इमारतीमधील स्वयंपाक घरात आग लागली. आगीचे कारण समजले नसले तरी ही आग वेगाने पसरली.

आग लागल्यानंतर इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणात धूर झाला. मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश जणांचा मृत्यू या धुरामुळे गुदमरूनच झाला आहे. येथील ‘एनबीटीसी’ कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ही इमारत भाडेतत्त्वावर घेतली आहे. येथे राहणारे भारतीय कर्मचारी प्रामुख्याने केरळ, तमिळनाडू आणि उत्तर भारतातील आहेत.

आग लागली त्यावेळी अनेक जण झोपेत असल्याने त्यांना बचावासाठी बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने काही मिनिटांतच बचावकार्य सुरू करत काही जणांना सुरक्षित बाहेरही काढले. मात्र, आग मोठी असल्याने प्रचंड धूर होऊन किमान ४५ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये ४२ जण भारतीय असल्याचे समजते. या घटनेत ५० हून अधिक भारतीय जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांना तातडीने कुवेतला जाण्यास सांगितले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे मृतदेह विनाअडथळा मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून या घटनेशी संबंधित असलेल्या सर्वांना मदत करण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे. भारताचे राजदूत आदर्श स्वाईका यांनी रुग्णालयात जाऊन जखमी भारतीयांची भेट घेत विचारपूस केली.

fire breaks out in a building in Kuwait
Loksabha Speaker :  लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कुवेतमधील आगीची घटना धक्कादायक आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात मी सहभागी आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाचे येथील परिस्थितीकडे लक्ष असून संबंधितांना सर्वप्रकारे मदत करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.