पॅरिस : जग पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात यायला सुरुवात झाल्याचं चित्र फ्रान्समधील स्थितीवरुन दिसू लागलं आहे. कारण फ्रान्समध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक (France Corona outbreak) झाला असून काल (बुधवार) दिवसभरात इथं २ लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, हा एक विक्रमच आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत असल्याचं फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिव्हिअर व्हेरान यांनी सांगितलं.
फ्रान्सच्या संसदेत माहिती देताना व्हेरान म्हणाले, "फ्रान्समध्ये बुधवारी २,०८,०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी १,७९,८०७ रुग्णांची नोंद झाली होती. आम्ही याला ओमिक्रॉनची लाट म्हणत नव्हतो, तर कोरोनाचा फुगवटा म्हणत होतो. गेल्या काही दिवसांपासून आम्ही जे पाहतोय तेच आकडे देत आहोत. याला आजवर आम्ही कोरानाची मोठी उलथापालथं समजत होतो"
जो कोणी ओमिक्रॉनबाधित होता त्याच्या संपर्कात आल्यानंतर १० टक्के फ्रेन्च लोकसंख्या संसर्गबाधित झाली आहे. लसीकरणही संरक्षणाचं पुरेसं काम करताना दिसत नाहीए. हा विषाणू खूपच वेगानं पसरतो आहे. दरम्यान, फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी सोमवारीच इशारा दिला होता की, जानेवारीच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये रोज अडीच लाख रुग्ण आढळतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.