मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मीरला पकडले; पाक ने केला होता मेल्याचा दावा

Mastermind of the Mumbai attacks Sajid Mir was caught in Pakistan
Mastermind of the Mumbai attacks Sajid Mir was caught in PakistanMastermind of the Mumbai attacks Sajid Mir was caught in Pakistan
Updated on

मुंबई : २६/११ या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (Mumbai attacks) सूत्रधार साजिद मीर (Sajid Mir) याला पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. एफबीआयने मीरला ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी घोषित केले आहे. परदेशी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेबाहेर नागरिकाची हत्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे या आरोपांवरून अमेरिकन एजन्सीने मीरला ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी घोषित केले आहे. (Mastermind of the Mumbai attacks Sajid Mir was caught in Pakistan)

मुंबई हल्ल्यात (Mumbai attacks) मृत्युमुखी पडलेल्या १६६ लोकांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. एफबीआयने मीरची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले होते. पाकिस्तान सरकार नेहमीच साजिद मीरबद्दल खोटे बोलत होता. नेहमीच साजिद मीरची उपस्थिती नाकारली. तसेच साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.

Mastermind of the Mumbai attacks Sajid Mir was caught in Pakistan
मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपीला अटक

मीर हा पाकिस्तानी (Pakistan) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबासाठी (LeT) काम करीत होता. साजिद मीरसह (Sajid Mir) लष्कर-ए-तैयबाने आयएसआयच्या मदतीने आणि पाठिंब्याने मुंबईत हल्ले केले. जेव्हा दहशतवादी मुंबईत होते तेव्हा साजिद मीर पाकिस्तानमध्ये त्यांचा कंट्रोलर होता आणि सर्व माहिती द्यायचा आणि घ्यायचा.

२०११ मध्ये अटक वॉरंट जारी

मीर हा २००१ पासून एलईटीचा वरिष्ठ सदस्य असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांचे मत आहे. २००६ ते २०११ या काळात त्याने गटाच्या वतीने विविध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली. एफबीआयचा असा विश्वास आहे की, त्याने २००८ ते २००९ दरम्यान डॅनिश वृत्तपत्र जाइलैंड्स-पोस्टेन आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर दहशतवादी (Terrorist) हल्ल्याचा कट रचला होता. एफबीआयने २२ एप्रिल २०११ रोजी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.

हेडलीने दिली कबुली

साजिद मीर हा दाऊद गिलानी ऊर्फ ​​डेव्हिड कोलमन हेडलीचा हँडलर होता. हेडली हा पाकिस्तानी-अमेरिकन दुहेरी एजंट होता. त्याने मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी टीम तयार केली होती. हेडलीने मुंबई हल्ल्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. तो सध्या अमेरिकेत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याचा सहकारी तहव्वूर राणा १४ वर्षांची शिक्षा भोगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.