जीनिव्हा - ‘दहशतवाद्यांनी १९९९ मध्ये अपहरण करून कंदाहारला नेलेल्या आयसी ८१४ या विमानात माझे वडील होते आणि त्याच वेळी मी तरुण सरकारी अधिकारी म्हणून परराष्ट्र विभागात कामही करत होतो,’’ अशी आठवण आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितली. अशा स्थितीत, एक नातेवाईक आणि एक सरकारी अधिकारी अशा दोन्ही पातळ्यांवर मला जबाबदारी सांभाळावी लागली होती, असे जयशंकर यांनी आज येथे एका कार्यक्रमात सांगितले.