'रॉ' च्या एजंट्सनी माझं अपहरण करुन, मला चोपलं, मेहुल चोक्सीचा दावा

"मी माझी गाडी घेऊन तिला आणण्यासाठी गेलो होतो. तिच्या घराजवळ पोहोचल्यानंतर तिने मला घरी येण्याचे निमंत्रण दिले"
mehul choksi fraud in Nashik
mehul choksi fraud in Nashik
Updated on

अँटिग्वा: मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला फरार हिरे व्यापारी (Fugitive diamand trader) मेहुल चोक्सीने (Mehul Choksi abduction)नवीन दावा केला आहे. त्याने त्याच्या अपहरणाचे खापर रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे 'रॉ' वर (raw) फोडले आहे. आपले ज्या दोघांनी अपहरण केले, ते रॉ चे एजंट होते, असा दावा चोक्सीने केला आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, मेहुल चोक्सीने गुरमीत सिंह आणि गुरजीत भांडाल या दोघांची फोटोंवरुन ओळख पटवली. 'रॉ' ही भारताची बाह्य गुप्तचर यंत्रणा आहे. परकीय शत्रुला (forign enemy) रोखण्याची जबाबदारी 'रॉ' वर आहे. (Mehul Choksi claims he was abducted beaten by RAW agents dmp82)

हे दोघेही रॉ चे एजंट असल्याचा त्याने दावा केला आहे. त्याने बाबारा जाराबिकाचीही ओळख पटवली. तिच्याच घरातून मेहुल चोक्सीचे अपहरण झाले होते. "गुरमीत सिंह आणि गुरजीत भांडाल हे दोघेही रॉ चे एजंट आहेत. मी डॉमिनिकाला पोहोचलो, त्यावेळी रॉ एजंटबद्दल ऐकून होतो. हे एजंट बेटांवर तसेच जगभरात विखुरलेले आहेत"' असे चोक्सीने सांगितले.

mehul choksi fraud in Nashik
'कारगिल युद्धाच्यावेळीच परवानगी दिली असती तर...' व्ही.पी. मलिक यांचं महत्त्वाचं विधान

"त्यांनी मला ते रॉ चे एजंट असून चौकशीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ते माझ्याबरोबर खूप कठोरपणे वागले. मला खूप मारहाण केली" असे चोक्सीने सांगितले. 23 मे रोजी मेहुल चोक्सी बारबारा जाराबिकाला डिनरला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी गेला होता.

mehul choksi fraud in Nashik
Kargil Vijay Divas : 54 ठिकाणची पाकची घुसखोरी मोडून काढली

"मी माझी गाडी घेऊन तिला आणण्यासाठी गेलो होतो. तिच्या घराजवळ पोहोचल्यानंतर तिने मला घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्यात काही चुकीचे नव्हते. मी माझी गाडी पार्क करुन, तिच्या घरी गेलो. तिने मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि इतक्यात तीन-चार मिनिटांनी दोन्हीबाजुंनी लोक घरात घुसले" असे मेहुल चोक्सी म्हणाला. "तू कोण आहेस ते आम्हाला माहित आहे, आम्ही तुला चौकशीसाठी नेत आहोत. त्यांनी मला तिच्या घरातून अक्षरक्ष: उचलून नेले" असे मेहुल चोक्सी म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.