PM modi Italy tour : मेलोनींसोबत सेल्फी, मंचावर स्पेशल जागा.. पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यात 'या' मुद्द्यांवर चर्चा

इटलीमधील प्युग्लिया प्रदेशातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ही परिषद झाली. स्थलांतराच्या प्रश्‍नाबरोबरच सर्वाधिक स्थलांतरित असलेल्या देशांना आर्थिक मदत करणे आणि मानवी तस्करी रोखणे या मुद्द्यांवरही परिषदेमध्ये चर्चा झाली.
PM modi Italy tour
PM modi Italy touresakal
Updated on

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ परिषदेसाठी इटली देशाच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. जगभातल्या शीर्ष नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींची वेगळी छाप पडत होती. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा पहिलाच इटली दौरा होता.

पंतप्रधानांनी इटलीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचं पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मॅक्रो यांच्यासह जगभरातल्या अनेक नेत्यांसोबत चर्चा केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. त्याशिवाय ग्रुप फोटोमध्ये त्यांना मंचावर विशेष स्थान दिलं गेलं.

PM modi Italy tour
Liquor Case : पिले.. पिलेSS.. ओ मेरे राजा ! एकाच शहरातील दारु दुकानांचा लिलाव; सरकारने कमावले 1 हजार 756 कोटी

पंतप्रधानांनी शनिवारी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर लिहिलं की, जी-७ परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. जगभरातल्या नेत्यांसोबत संवाद साधता आला.. त्यामुळे वेगवेगळे विषयांवर चर्चा झाली. सर्वांनी सोबत मिळून काम केल्यास वेगवेगळ्या विषयांवर तोडगा निघणार आहे. यातून भावी पिढ्यांसाठी एक सुंदर जग निर्माण करता येणार आहे. मी इटली सरकार आणि त्यांच्या लोकांचे आभार मानतो.. अशी पोस्ट पंतप्रधानांनी केली.

इटलीमधील प्युग्लिया प्रदेशातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ही परिषद झाली. स्थलांतराच्या प्रश्‍नाबरोबरच सर्वाधिक स्थलांतरित असलेल्या देशांना आर्थिक मदत करणे आणि मानवी तस्करी रोखणे या मुद्द्यांवरही परिषदेमध्ये चर्चा झाली.

याशिवाय, युक्रेन-रशिया युद्ध, गाझा पट्टीतील युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरण बदल, चीनचे औद्योगिक धोरण आणि आर्थिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवरही परिषदेत चर्चा झाली. परिषदेचे यजमानपद इटलीकडे असून अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, कॅनडा आणि जर्मनी या सदस्य देशांचे प्रमुख आणि भारतासह इतर काही निमंत्रित देशांचे प्रमुखही येथे दाखल झाले आहेत.

PM modi Italy tour
Koyna Express Accident : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसनं तिघींना चिरडलं; दोन महिलांसह लहान मुलगी जागीच ठार

कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?

जॉर्जिया मेलोनी इटलीसारख्या प्रगतीपथावर असलेल्या देशाच्या पंतप्रधान आहेत.जॉर्जिया यांचा जन्म 1977 मध्ये इटलीची राजधानी रोममधील गरबाटेला येथे झाला. जॉर्जिया यांचा राजकीय प्रवास सर्वांनाच माहिती आहे. जॉर्जिया यांनी गेल्यावर्षी एक आत्मचरित्र लिहीलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

'जॉर्जिया मेलोनी यांनी राजकीय कारकिर्द 1992 मध्ये सुरू झाली होती. इटालियन सोशल मूव्हमेंट MSI च्या युवा विंगमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्या राजकीय विश्वात एकामागून एक यशाची शिडी चढू लागल्या. आज त्या इटलीच्या पंतप्रधान आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com