Meta Lay off: चार महिन्यांचा पगार घ्या, गप घरी बसा; झुकरबर्गलाही लागलं मस्कचं वारं

 Mark Zuckerberg
Mark Zuckerbergesakal
Updated on

ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. ट्विटरनंतर इन्स्टाग्रामनंही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता फेसबुकची पेरेंट कंपनी असेलेल्या मेटाचीही समावेश होणार आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेटानं 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. मात्र, विशेष म्हणजे कपात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले आहे. (Meta Layoffs Mark Zuckerberg Meta to Cut 11000 Jobs)

मेटानं 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीनं ही कारवाई केली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की मी मेटाच्या इतिहासातील काही सर्वात कठीण बदल शेअर करत आहे. मी माझ्या टीमचा आकार सुमारे 13 टक्क्यांनी कमी करण्याचा आणि आमच्या 11,000 हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, आम्ही खर्चात कपात करून आणि Q1 च्या माध्यमातून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं उचलत आहोत." त्यामुळं मोठ्या प्रमाणात बजेट कपातीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे डिजिटल जाहिरातींच्या कमाईत तीव्र मंदीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे. अशी माहिती मार्क झुकरबर्ग यांनी ब्लॉगमधून दिली आहे.

मेलद्वारे कर्मचाऱ्यांना कळवलं जाणार

मेटाच्या सीईओने दिलेल्या माहितीनुसार, कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच ईमेल येईल. त्यामध्ये त्यांना का काढण्यात आले याची माहिती ईमेलमध्ये कळविण्यात येईल. मेटा कर्मचार्‍यांना कपात करताना कंपनी काय कारवाई करू शकते याबद्दल सूचित करेल. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना "त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि माहिती सत्रात उपस्थित राहण्यासाठी एखाद्याशी बोलण्याची संधी असेल.

४ महिन्याचा पगार मिळणार

कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४ महिन्याचा पगार देणार आहे. तसेच, पुढील सहा महिन्यांसाठी बाधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य सेवा खर्च देण्याचा निर्णयही मेटाने घेतला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांची पुढील नोकरी शोधण्यात तसेच इमिग्रेशन-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात मदतदेखील मेटा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.