'मेटाव्हर्स' म्हणजे नेमकं काय? साऱ्या जगात सुरु आहे चर्चा

गेल्या काही दिवसांपासून मेटाव्हर्स नावाच्या संकल्पनेनं आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Metaverse
Metaverse
Updated on

Metaverse: आज आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या (Information And Technology) अशा उंबरठ्यावर आहोत की ज्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक शाखा आपल्यसमोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजिन्स (Artificial Intelligence) . त्याचाच एक भाग म्हणुन इतरही काही शाखा उदयास आल्या आहेत. त्याची माहिती आपण घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून मेटाव्हर्स नावाच्या संकल्पनेनं आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका आभासी तंत्रज्ञानाव्दारे ओळख तयार करुन त्याव्दारे कम्युनिकेशन करण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जात आहे. मेटाव्हर्स ही संकल्पना नवीन नाही. ती तीन दशकांपूर्वी 1992 मध्ये चर्चेत आली होती. अमेरिकन सायन्स फिक्शन लेखक निया स्टीफन्सन यांनी त्यांच्या 'स्नो क्रश' या कादंबरीत मेटाव्हर्सविषयी लिहिलं होतं.

त्याच्याविषयी आणखी सांगायचे झाल्यास, अजुनतरी ही प्रक्रिया सविस्तरपणे विकसित झालेली नसून त्यावर विविध पातळीवर संशोधन सुरु असल्याचे दिसून आले आहे. एका आभासी विश्वात डिजिटल मीडियाच्या नावाखाली आपण कम्युनिकेशन प्रक्रियेत सहभागी होणे असा अर्थ या मेटाव्हर्समध्ये गृहित धरला गेला आहे. यातून केवळ संप्रेषण नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो. त्यामध्ये वस्तुंची खरेदी विक्री, आपल्या मित्रांना भेटण्याची संधी, व्ही आर अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटी सारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. अजूनही प्रक्रिया प्राथमिक स्वरुपात असून त्यावर संशोधन सुरु आहे. यासगळ्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून त्याला आर्टिफिशयल इंटेलिजिन्सची जोडही देण्यात आली आहे.

Metaverse
Video: वायुदलाच्या प्रशिक्षण केंद्राचं विमान कोसळलं

मेटा व्हर्सबाबत आणखी सांगायचं झाल्यास आता वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यावर प्रयोग व्हायला सुरुवात झाली आहे. जसं की काही वर्षांपूर्वी आपल्याकडे आर्टीफिशयल इंटेलिजन्सबाबत आपण अनभिज्ञ होतो त्याचधर्तीवर आता मेटाव्हर्स नावाची संकल्पना आपल्यापुढे येत आहे. मेटाव्हर्सवर फेसबूकनं काम सुरु केलं आहे. मात्र त्यावर काम करणारं फेसबूक ही पहिली कंपनी नाही. त्यापूर्वी डेसेंट्रालँडनं 2017 मध्ये या संकल्पनेवर काम केलं होतं. अशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. थोडक्यात काय तर एक वेगळचं जग, ज्यात तुम्ही पूर्णपणे आभासीरित्या सहभागी झाला असाल, सगळे व्यवहारही आभासी असतील....

Metaverse
Doobey Viral: डूबे'ची क्रेझ, दीपिका सिद्धांतचा 'गहराइया'

मेटाव्हर्स हे आभासी जग आहे. अजून सगळ्यांनाच या प्रकारच्या सुविधेचा लाभ घेण्याची संधी मिळाली नसली तरी, येत्या काळात ती सर्वांना उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे. आपल्या भवतालच्या जगाशी पूर्णपणे एकरुप झाल्यावर आणखी कुठल्या गोष्टीचा विचार मनात येत नाही. मात्र मेटाव्हर्समध्ये तुम्ही जे पाहता ते तुम्हाला खरेदी करण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. अजून तरी प्रायोगिक तत्वावर सुरु असणाऱ्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला मुर्त रुप येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.