मॅक्सिको- मॅक्सिको कायदेमंडळाने नुकतेच एलियन स्पिसिजचे दुसरे सेशन भरवले होते. यामध्ये एलियन्स खरे असल्याचे आणखी काही पुरावे सादर करण्यात आले आहेत. यात एका तीन बोटांच्या एलियन्सला त्यांनी समोर आणलं असून तो खरा असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. तो परग्रहावरुन आल्याचा दावा करण्यात आला आहे. (Mexico Congress Holds Second UFO Session New Alien Species Revealed The researchers noted that the bodies had hybrid DNA)
याआधी १३ सप्टेंबरला पहिलं सेशन भरलं होतं. यामध्ये कॉन्सिलने दोन कथित एलियन्सचे मृतदेह समोर आणले होते. मॅक्सिकन पत्रकार आणि यूएफओ विषयात रस घेणारे जेम मऊसान यांनी मृतदेह एलियन्सचेच असल्याचा दावा केला होता. त्यांनी दोन मृतदेह समोर ठेवले होते. त्यातील एकाचे नाव क्लॅरा आणि दुसऱ्याचा माऊरिसीओ असं ठेवण्यात आलं होतं.
समोर ठेवलेल्या कथित एलियन्सच्या हातांना तीन बोटे होती आणि लांब डोके होते. दाव्यानुसार, हे मृतदेह पेरुच्या नाझका या पुरातन भागात सापडले होते. एक हजार वर्षांपूर्वीचे हे सॅम्पल असून २०१७ मध्ये एका खाणीमध्ये त्यांचा शोध लागला होता. मॅक्सिकोच्या राष्ट्रीय संस्थेने सॅम्पल एक हजार वर्षे जूने असल्याबाबत पुष्टी केली होती.
दुसऱ्या सेशनमध्ये हे मृतदेह एलिएन्सचेच असल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्यात आले. यावेळी काही वैज्ञानिकांची मदत घेण्यात आली. या मृतदेहांमध्ये मानवीय आणि शरिरशास्त्र अशाप्रकारचा काही अशं सापडला नाही. त्यामुळे ते परग्रहवासीच आहेत असा दावा वैज्ञानिकांनी केला होता. पण, या मृतदेहांच्या उगमाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृतदेहांचे डीएनए हायब्रिड आहेत. तसेच हे आपल्यापेक्षा विकसित प्रजाती असून ते आपल्यापासूनच निर्माण झाले नाहीत. आपण काहीतरी असमान्य असं पाहत आहोत, असं जेम मऊसान म्हणाले. दरम्यान, अमेरिकेसह इतर काही देशांनी मॅक्सिकोचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच संशोधनासाठी कथित एलियन्सचे मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.