लवकरच आणखी एका महासाथीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स

लवकरच आणखी एका महासाथीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स
Updated on

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी कोरोना महासाथीबाबत पुन्हा एकदा महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, आणखी एक साथीचा रोग आता जवळ आला आहे. त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

लवकरच आणखी एका महासाथीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स
महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा यशस्वी होतोच; केसीआर यांचा इशारा

CNBCला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलंय की, भविष्यात येणारी ही महामारी कोरोना विषाणूच्या कुटुंबातील विषाणू सदस्यामुळे येणार नसून एका वेगळ्या संसर्गामुळे होईल, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे. पुढे त्यांनी कोरोना विषाणूबाबत बोलताना म्हटलंय की, लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आता कोरोनापासून गंभीर संसर्ग होण्याचा धोका आता "नाटकीयरीत्या कमी झाला आहे."

बिल गेट्स यांनी आधीच डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन लाटेबाबतचा इशारा दिला होता. ते 'गेट्स नोट्स' या ब्लॉगच्या माध्यमातून नियमितपणे हवामान बदल आणि जागतिक आरोग्याच्या समस्येवर चर्चा करत असतात. बिल यांनी आपल्या पूर्वीच्या पत्नी मेलिंडा यांच्यासोबत 'बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'ची स्थापना केली होती. हे फाऊंडेशन आरोग्य सेवा आणि अविकसित देशांमध्ये असलेली भीषण गरिबी कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी प्रयत्नशील आहे.

आपल्याला आणखी एका साथीच्या रोगाला तोंड द्यावं लागेल." असं बिलगेट्स चर्चा सत्रादरम्यान म्हटलंय. मात्र, पुढच्या वेळी रोगास कारणीभूत ठरणारा घटक वेगळा असेल. पुढे ते म्हणाले की, गंभीर रोगाचा धोका हा प्रामुख्याने वृद्ध आणि लठ्ठपणा किंवा मधुमेह असणाऱ्यांना असतो. मात्र, आता कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात तो धोका कमी झाला आहे.

लवकरच आणखी एका महासाथीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स
आठवले म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार; पण...

त्यांनी असंही म्हटलंय की, 2022 च्या मध्यापर्यंत जगातील 70% लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे WHO चे उद्दिष्ट हा खरं तर "खूप उशीर" ठरेल. परंतु, रोगाची तीव्रता कमी झाल्यामुळे ते आशावादी आहेत. सध्या तरी जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 61 टक्के लोकांना COVID-19 लसीकरणामधील किमान एक डोस मिळाला आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, मेसेंजर RNA (mRNA) तंत्रज्ञान हे आरोग्यसेवा सुधारण्यासाठी नक्कीच मदत करेल. "मात्र, पुढे येऊ पाहणाऱ्या महामारीसाठी तयार होण्याची किंमत इतकी जास्त असणार नाही," असंही ते म्हणालेत. हे काही ग्लोबल वार्मिंगसारखे नाही. मात्र, हो! जर आपण तर्कास प्रमाण मानत असू तर आपण पुढच्या वेळी लवकरच यातून बाहेर पडू." असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेट्स यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये भारताचने 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं होतं. भारताच्या या प्रयत्नांबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()