Microsoft मधील १८०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, आर्थिक मंदीची भीती

दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
Microsoft News Updates |Microsoft announces job cuts
Microsoft News Updates |Microsoft announces job cutsesakal
Updated on

दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याआधी जगातील अनेक मोठ्या कंपन्याही आर्थिक मंदीचे कारण देत आपले कर्मचारी कमी करत आहेत. सत्या नडेला संचालित मायक्रोसॉफ्ट ‘पुनर्रचना’चा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली टेक कंपनी बनली आहे. यानंतर कंपनीने यावर स्पष्टीकरणही दिले आहे.(Microsoft lays off 1800 employees as part of restructuring process)

Microsoft News Updates |Microsoft announces job cuts
फेसबुकनंतर Google चा मोठा निर्णय; यंदा कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती

मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात आणि उत्पादन विभागातील 1.81 लाख कर्मचार्‍यांपैकी सुमारे 1 टक्के, म्हणजेच सुमारे एक टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले. या निर्णयामुळे 1,800 कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. या घटनेला कंपनीच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.(Microsoft Latest News)

काय आहे कारण? (Reason Why Microsoft Announces Job Cuts)

या प्रकरणी कंपनीने निवेदनदेखील दिले आहे. ‘सर्व कंपन्यांप्रमाणे आम्ही नियमितपणे आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यांचे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार संरचनात्मक समायोजन करतो. येत्या वर्षभरात आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करत राहू आणि एकूण कर्मचारी संख्या वाढवू. अले आश्नासन मायक्रोसॉफ्टने दिले आहे.

तसेच, मायक्रोसॉफ्टने विंडोज, टीम्स आणि ऑफिस ग्रुप्समधील नोकरभरतीही कमी केली असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

Microsoft News Updates |Microsoft announces job cuts
Twitter Deal Ends: अखेर ट्वीटरची Elon Musk विरोधात कारवाई; केले गंभीर आरोप

माहितीनुसार, नफ्याच्या आघाडीवर, मायक्रोसॉफ्टने तिसर्‍या तिमाहीत मजबूत कमाई नोंदवली, ज्यामध्ये क्लाउड रेव्हेन्यूमध्ये 26 टक्के वाढ झाली (वर्षानुवर्षे) आणि एकूण कमाई $49.4 अब्ज इतकी आहे.

याशिवाय अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तत्पूर्वी, ट्विटरने आपल्या भर्ती टीममध्ये 30 टक्के कपात केली आहे, तर एलोन मस्क-चालित टेस्ला देखील सतत शेकडो कर्मचार्‍यांना काढून टाकत आहे. याशिवाय Nvidia, Snap, Uber, Spotify, Intel आणि Salesforce या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.