Microsoft Update Issue : ऑनलाइन व्यवहार कासवगतीने पूर्वपदावर;‘क्राउडस्ट्राइक’चा माफीनामा

‘मायक्रोसॉफ्टची विंडो अचानक क्रॅश झाल्याने जगभर शुक्रवारी मोठा हाहाकार माजला होता. या आयटी धक्क्यातून जग हळूहळू सावरू लागले असून शनिवारी अनेक देशांतील विमान, रेल्वे सेवा पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Microsoft Update Issue
Microsoft Update Issuesakal
Updated on

लंडन : ‘मायक्रोसॉफ्टची विंडो अचानक क्रॅश झाल्याने जगभर शुक्रवारी मोठा हाहाकार माजला होता. या आयटी धक्क्यातून जग हळूहळू सावरू लागले असून शनिवारी अनेक देशांतील विमान, रेल्वे सेवा पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश ठिकाणचे आर्थिक व्यवहार देखील सुरळीत होऊ लागले आहेत. दरम्यान विंडो प्रणालीतील तांत्रिक बिघाड अद्याप कायम असून ही स्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागेल आयटी क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

‘मायक्रोसॉफ्ट विंडो’मध्ये फॉल्टी सॉफ्टवेअर अपडेट झाल्याने ही आणीबाणीसदृश्य स्थिती उद्‍भवल्याचे ‘क्राउडस्ट्राइक’ या सायबर सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे. या कंपनीकडून आज शनिवारी जगभर निर्माण झालेल्या आयटी संकटाची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली तसेच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याबद्दल माफीनामाही प्रसिद्ध करण्यात आला. या गोंधळाचा सर्वांत मोठा फटका हा कॉर्पोरेट आयटी कंपन्या, बँका, रुग्णालये आणि विमानसेवा पुरविणाऱ्यांना कंपन्यांना बसला होता.

प्रणालीतील बिघाड कायम

अनेक विमानतळांवर चेक-इन प्रणाली आणि पेमेंट स्वीकारणाऱ्या प्रणालीमध्ये अडथळे येत असले तरीसुद्धा विमानांची उड्डाणे मात्र पूर्ववत झाली आहेत. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे ही पूर्ववत झाली असल्याचे चिनी माध्यमांनी म्हटले आहे.

नुकसानीचा आकडा अस्पष्ट

या सायबर गोंधळाचा मोठा आर्थिक फटका हा क्राउडस्ट्राइक या सायबर सिक्युरिटी फर्मला देखील बसला आहे. या कंपनीच्या समभागांमध्ये तब्बल बारा टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या सगळ्या गोंधळामुळे नेमके किती आर्थिक नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.