Microsoft : अपडेट एररमुळे ‘मेगा’हाल;‘मायक्रोसॉफ्ट’ची विंडो अचानक बंद,रेल्वे-विमानसेवा ठप्प

अवघ्या जगाची सेवा खिडकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ मध्ये आज सायबर सिक्युरिटी फर्म ‘क्राउडस्ट्राईक’ने फॉल्टी अपडेट केल्याने जगभर हाहाकार माजला.
Microsoft
Microsoft sakal
Updated on

नवी दिल्ली- फ्रँकफर्ट : अवघ्या जगाची सेवा खिडकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ मध्ये आज सायबर सिक्युरिटी फर्म ‘क्राउडस्ट्राईक’ने फॉल्टी अपडेट केल्याने जगभर हाहाकार माजला. भारतासह अनेक देशांतील विमानसेवा, रुग्णालये, रेल्वे आणि आरोग्य सेवेला याचा मोठा फटका बसला. याचा देशोदेशीच्या रोखे बाजारावरही परिणाम झाला. लंडन स्टॉक एक्सचेंजसह जगभरातील बहुतांश रोखे बाजारातील व्यवहारांची गती यामुळे मंदावली होती. अनेक ठिकाणचे ऑनलाइन व्यवहार देखील थांबले होते.

भारतामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळूर, कोलकता आणि जयपूरसह बड्या मेट्रो शहरांतील विमानसेवेला याचा फटका बसला, अनेक ठिकाणी उड्डाणांना विलंब झाला. काही ठिकाणची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. बुकिंग, चेक-इन आणि इतर ऑनलाइन सेवांवरही याचा परिणाम झाला. अनेक विमानतळांवर हाताने बोर्डिंग पास लिहून द्यावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गोंधळाचा फारसा परिणाम हा देशातील वित्तप्रणालीवर झालेला नाही असे ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडून सांगण्यात आले असले तरी बारा बँकांचे व्यवहार यामुळे प्रभावित झाले होते.

‘क्राउडस्ट्राईक’चे म्हणणे

‘हा सुरक्षाविषयक प्रकार नसून तो सायबरहल्ला देखील नाही. नेमका तांत्रिक बिघाड काय आहे? हे आमच्या लक्षात आले असून लवकरच तो दुरुस्त केला जाईल,’’ असे ‘क्राउडस्ट्राईक’च्या अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

मायक्रोसॉफ्ट म्हणते...

‘‘या गोंधळामुळे बाधित झालेली इंटरनेट ट्रॅफिक आम्ही पर्यायी सिस्टिम्समध्ये वळविण्याचा प्रयत्न करत आहोत. परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणांवर सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत,’’ असे ‘मायक्रोसॉफ्ट’कडून सांगण्यात आले.

जगभरातील चित्र

  • ऑस्ट्रेलियात संस्थांचा संगणकीय संपर्क तुटला

  • एबीसी, स्काय न्यूजच्या प्रसारणालाही फटका

  • युरोपमध्ये सेवांचा खोळंबा

  • न्यूझीलंडमध्ये वित्तीय संस्थांना फटका

  • इस्राईलच्या सायबर संचालनालय प्रभावित

  • जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेतील बड्या विमान कंपन्यांच्या सेवांवर परिणाम

  • दक्षिण आफ्रिकेमध्ये बँकिंग सेवेच्या

  • गतीवर परिणाम

  • ‘लंडन स्टॉक एक्सचेंज’ अचानक ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.