Iran Israel War Video: इस्रायलमध्ये हाहाकार इराणने डागली 100 हून अधिक क्षेपणास्त्रे; पाहा थरारक व्हिडिओ

Iran Missile Attack On Israel: इराणच्या हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच अमेरिकेने इराण इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. या इशाऱ्यानंतर काही वेळातच इस्रायलवर हल्ला करण्यात आला.
Iran Vs Israel
Iran Vs IsraelEsakal
Updated on

इस्रायल आणि इराणमधील परिस्थिती आता आणखी गंभीर होत चालली आहे. दरम्यान इराणने इस्रायलवर 100 हून अधिक रॉकेट डागले आहेत, त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे क्षेपणास्त्र हल्ले टाळण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही आश्रयाला जावे लागले. इराणने इस्रायलवर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याचे अनेक व्हिडिओही समोर येत आहेत.

या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान इराण मिलिटरीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून इस्रायलवर त्यांनी केलेल्या एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, "ही आमची हायपरसोनिक सिस्टीम आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर रोखून दाखवा."

इराणच्या हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच अमेरिकेने इराण इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. या इशाऱ्यानंतर काही वेळातच इस्रायलवर हल्ला करण्यात आला.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्व आशियामध्ये मोठे युद्ध सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे. इराणच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देऊ असे इस्रायलने आधीच सांगितले आहे. त्याचबरोबर इस्रायलला अमेरिकेचाही पाठिंबा मिळाला आहे.

इराणने इस्रायलवर थेट हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, इराणला जे गंभीर परिणाम भोगावे लागतील त्याबाबत मी माझ्या इस्रायली समकक्षाशी चर्चा केली आहे.

Iran Vs Israel
हृदयद्रावक ! पिकनिकला निघालेल्या शाळेच्या बसने अचानक घेतला पेट, २५ मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे की, इस्माईल हानिया, नसराल्लाह आणि इराणी जनरल यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.

इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यास आम्ही विध्वंसक पद्धतीने प्रत्युत्तर देऊ, असे संयुक्त राष्ट्रातील इराणच्या मिशनने म्हटले आहे.

Iran Vs Israel
ब्राझीलमध्ये वणव्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय घट; तब्बल 50 लाख टन उसाचे नुकसान, 60 हजार हेक्टर क्षेत्र भस्मसात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.