VIDEO - अफगाण शरणार्थींना रोखण्यासाठी उभारली जातेय भिंत

VIDEO - अफगाण शरणार्थींना रोखण्यासाठी उभारली जातेय भिंत
Updated on
Summary

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर हजारो लोक देशातून पलायन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरणार्थींचा प्रश्न समोर येत आहे.

काबूल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर हजारो लोक देशातून पलायन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरणार्थींचा प्रश्न समोर येत आहे. आता तुर्कीने शरणार्थींना देशात येण्यापासून रोखण्यासाठी काम सुरु केलं आहे. इराणला लागून असलेल्या सीमेवर तुर्कीकडून भिंत उभारण्यात येत आहे. तुर्कीने त्यांच्या इराणला लागून असलेल्या सीमेवर 295 किमी लांब भिंत उभारण्याचं ध्येय ठेवलं आहे. सध्या यात फक्त 5 किलोमीटर काम उरलं आहे. आधीपासूनच लाखो शरणार्थी तुर्कीमध्ये राहत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या हिंसाचाराच्या घटनानंतर काबुल विमानतळावरून उड्डाणांसाठी तुर्की तयार आहे. परदेशी सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर विमानतळाची सुऱक्षा करू असं असंही तुर्कीने म्हटलं आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी आधीच म्हटलं होतं की, तालिबानच्या वाढत्या वर्चस्वावर लक्ष आहे.

VIDEO - अफगाण शरणार्थींना रोखण्यासाठी उभारली जातेय भिंत
युद्ध न लढताच अफगाण सैन्याने शरणागती का पत्करली? समजून घ्या..

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हालचाली वाढल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी अनेक देशांमध्ये आश्रय घेतला आहे. काही अफगाण नागरीक पळून तुर्कीमध्ये पोहोचले आहेत. संयुक्त राष्ट्रानेसुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानच्या नागरिकांना वाचवण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी तालिबान आणि इतर सर्वांनी संयम बाळगण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे.

VIDEO - अफगाण शरणार्थींना रोखण्यासाठी उभारली जातेय भिंत
पैशांनी भरलेल्या ४ गाड्या अन् हेलिकॉप्टर घेऊन पळाले राष्ट्रपती घनी

संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्र यावर शांततेनं तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व अफगाण नागरिक, विशेषत: महिला, मुलींच्या मानवाधिकारांचे संरक्षण करण्यास आणि गरजू नागरिकांना आवश्यक मदत करण्याचा संकल्प संयुक्त राष्ट्राने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.