किव्हमधून भारतीय दूतावास स्थलांतरित; युद्धामुळे परिस्थिती अत्यंत बिकट

Ukraine Russia war
Ukraine Russia warUkraine Russia war
Updated on

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय दूतावास (Indian Embassy) राजधानी किव्हमधून हलवण्यात आला आहे. भारतीय दूतावास तात्पुरते पोलंडमध्ये हलवले आहे.

युक्रेनमध्ये (ukraine) युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. युक्रेनचा पश्चिम भागही सतत हल्ले करीत आहे. पश्चिम युक्रेनमधील लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान नऊ जण ठार झाले, तर ५७ जण जखमी झाले आहेत. रशियाच्या या हल्ल्याने युद्ध पोलंडच्या सीमेजवळ पोहोचले आहे. याआधी रशियाच्या एका वरिष्ठ मुत्सद्द्याने असा इशारा दिला होता की, मॉस्को परदेशातून युक्रेनला लष्करी पुरवठ्याला लक्ष्य करेल. वाढता धोका पाहता भारतीय दूतावास (Indian Embassy) तात्पुरते पोलंडमध्ये (Poland) हलवण्यात आले आहे.

Ukraine Russia war
काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; सुनील जाखड यांचे मोठे विधान

अनेक क्षेपणास्त्रे डागली

रशियन (russia) सैन्याने ल्विव शहराच्या वायव्येला ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या यावोरीव लष्करी तळावर किमान ३० क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. हा लष्करी तळ युक्रेनियन सीमेपासून ३५ किमी अंतरावर आहे. रशियन सैन्याने पश्चिम युक्रेनच्या इव्हानो-फ्रँकिव्हस्क शहरातील विमानतळावरही गोळीबार केला. असे हल्ले करून रशियाला भीती आणि अराजकता निर्माण करायची होती, असे महापौर रुस्लान मार्टसिंकीव्ह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.