Uganda Attack : युगांडा येथील शाळेवर अतिरेक्यांचा हल्ला; ४१ जण ठार,अनेकजण जखमी

युगांडातील घटना ; मृतांत ३८ विद्यार्थ्यांचा समावेश
Uganda Attack
Uganda Attacksakal
Updated on

कँपाला (युगांडा) : पश्‍चिम युगांडातील एम्पाँडवेमधील लुबिरिहा माध्यमिक शाळेवर ‘अलाईड डेमोक्रॅटिक फोर्स’च्या (एडीएफ) या बंडखोरांच्या संघटनेने शुक्रवारी रात्री हल्ला केला. यामध्ये ३८ विद्यार्थ्यांसह ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

ही शाळा युगांडा आणि काँगो लोकशाही प्रजासत्ताक या देशाच्या सीमेवर आहे. हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक आणि स्थानिक जमातीमधील दोन सदस्यांची बळी गेला असल्याचे एम्पाँडवे- लुबिरिहाचे महापौर सिल्व्हेस्ट एमपोझे यांनी आज सांगितले. बंडखोरांनी काल रात्री हल्ला केल्यानंतर अनेकांनी काँगोची सीमा ओलांडली. अशा व्यक्तींचे बंडखोरांनी अपहरण केले. त्यांनी शाळेच्या वसतिगृहाला लावलेल्या आगीत काही विद्यार्थी होरपळले तर काहीजणांवर गोळीबार करण्यात आला. तसेच चाकूने भोसकण्यात आले, असे एमपोझे यांनी सांगितले.

Uganda Attack
Terrorist Attack : युगांडातील एका शाळेवर दहशतवाद्यांचा हल्ला, 25 विद्यार्थी ठार

पूर्व काँगोला अस्थिर करण्यासाठी ‘एडीएफ’चे बंडखोर काही वर्षांपासून सातत्याने हल्ले करीत आहेत. त्यांनी काल लुबिरिहा शाळेवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही शाळा काँगोपासून दोन किलोमीटर अंतरावरील कॅसेसी जिल्ह्यात आहे. या खासगी शाळेत मुले-मुली एकत्र शिकतात. युगांडाच्या सैन्याने हल्लेखोरांचा काँगोच्या विरुंगा राष्ट्रीय उद्यानापर्यंत माग काढला असून अपहरण केलेल्या युगांडाच्या नागरिकांना सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सैन्यदलाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.