नवी दिल्ली : भारतात सध्या पेगॅसस पाळत प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणी आता पेगॅसस स्पायवेअर बनवणारी कंपनी एनएसओ ग्रुपने आपल्या बचावासंदर्भात एक दावा केला आहे. इस्रायलच्या या कंपनीने म्हटलंय की, गुप्तचर यंत्रणा आणि कायदा लागू करणाऱ्या एजन्सीजना टेक्नोलॉजी उपलब्ध करवून दिल्यानेच जगभरातील लाखो लोक रात्री सुखाने झोप घेऊ शकतात तसेच सुरक्षित राहू शकतात.
पुढे कंपनीने म्हटलंय की, ते टेक्नोलॉजी ऑपरेट करत नाहीत तसेच ते त्यांच्या ग्राहकांकडून जमा केलेल्या डेटापर्यंत पोहोचू शकत नाहीत. भारतासहित अनेक देशांच्या पत्रकारांनी, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पेगॅससच्या या पाळत प्रकरणावरुन आपला आवाज उठवला आहे. या इस्रायली कंपनीद्वारे वेगवेगळ्या सरकारांना विकल्या गेलेल्या या स्पायवेअरच्या माध्यमातून अनेक नेत्यांना, मानवाधिकार कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांसहित इतर अनेक लोकांवर पाळत ठेवल्याचा आरोप आहे.
एनएसओच्या एका प्रवक्त्याने दावा केला आहे की, पेगॅसस आणि यासारख्या टेक्नोलॉजीमुळे जगातील लाखो लोक रात्री सुखाने झोपू शकतात आणि रस्त्यावर सुरक्षित वाटून निर्भयपणे जाऊ शकतात. या प्रकारच्या टेक्नोलॉजीमुळेच गुप्तचर यंत्रणा तसेच कायदा लागू करणाऱ्या एजन्सीज या इनक्रिप्टेड ऍपच्या माध्यमातून गुप्त माहिती शोधून गुन्ह्यांची उकल करु शकतात तसेच दहशतवादी संघटनांच्या कुटील डावांना उधळून लावू शकतात.
कंपनीने पुढे म्हटलंय की, जगभरातील इतर सायबर गुप्तचर कंपन्यांसोबत एनएसओ सरकारांना सायबर सुरक्षा उपकरण उपलब्ध करुन देते. सध्या यावरुन सुरु असलेल्या वादाबद्दल कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, एनएसओ या टेक्नोलॉजीचे संचलन करत नाही, तसेच आमच्याकडे एकत्र केला गेलेला डेटा पाहण्याची सुविधा देखील नाहीये. त्यांनी पुढे म्हटलंय की, आम्ही एक सुरक्षित जग बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.