जगातल्या सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) संधीचं सोनं केलं आहे. जगातल्या या सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेत विजय मिळवत हरनाज आज मिस युनीव्हर्स (Miss Univers 2021)ची मानकरी ठरली आहे. इस्रायलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेला फॅशन आणि सौंदर्यविश्वात मोठं महत्त्व आहे. तब्बल २१ वर्षांनंतर हा मिस युनिव्हर्सचा मुकुट हरनाजने भारतात परत आणला आहे.
यावर्षी 12 डिसेंबर रोजी इस्रायलच्या दक्षिणेकडील इलात शहरात 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. जगभरातून आलेल्या सुंदर मुलींशी स्पर्धा करण्यासाठी भारताकडून हरनाज संधू या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात तिला एक प्रश्न विचारण्यात आला आणि याच प्रश्नाच्या उत्तराने तिला मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळाला. अनेक लोकांना वाटतं की क्लायमेट चेंज ही मोठी समस्या आहे, तुला याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरनाज म्हणाली, "हवामान बदल ही गंभीर समस्या असून, मला त्याबद्दल काळजी वाटते. त्यावर काम करणं गरजेचं आहे. हे सर्व आपल्या निष्काळजीपणामुळे होतंय. तुम्ही केलेली कृती पर्यावरणाला वाचवू शकते. एखादी गोष्ट नंतर सुधारण्यापेक्षा त्यासाठी आधीच काळजी घेतलेली उत्तम." याच उत्तरामुळे परीक्षकांनी तिला विजयी घोषित केलं.
दरम्यान, अभिनेत्री लारा दत्ताने २००० मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट भारतात आणला. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.