Pakistan Blasphemy : पैगंबरांसोबत इमरान खान यांची तुलना; जमावाने तरूणाला ठेचून मारलं!

Pakistan Army
Pakistan Army File Photo
Updated on

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी घडली असून. एका रॅलीदरम्यान मृत व्यक्तीवर ईशनिंदा केल्याचा आरोप होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संतप्त जमावाने ईशनिंदा केल्याचा आरोप करत एका व्यक्तीची हत्या केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कथित व्हिडिओमध्ये शेकडो लोकांचा जमाव एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. मृत हा मुस्लिम स्कॉलर असून त्याचे वय सुमारे ४० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्ती हा माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. जो पीटीआयच्या रॅलीला आला होता.

या घटनेबाबत लेखक हॅरिस सुलतान यांनी ट्विट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये इस्लामबद्दल काहीही बोलणे धोकादयक ठरू शकते असे त्यांनी म्हटले आहे. संतप्त जमावाने इम्रान खानच्या समर्थकाच्या हत्येबाबत त्यांनी दावा केला आहे की जमावाने ज्या व्यक्तीला मारले तो मुस्लिम स्कॉलर होता.

Pakistan Army
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली रश्मी अन् तेजस ठाकरेंची भेट? श्रीकांत शिंदे म्हणतात...

लेखकाच्या दाव्यानुसार, मृत व्यक्तीचा एकच गुन्हा आहे की त्याने जाहीरपणे कबूल केले की त्याचे इम्रान खान यांच्यावर पैबंगर यांच्या इतकेच प्रेम करत होता. इम्रान खान यांच्यावर प्रेम करण्यामागे त्यांनी तर्क दिला होता की पीटीई प्रमुख अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. हॅरिस सुलतान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी जवळपास 5 वर्षांपासून म्हणत आहे की, लिंचिंगच्या अशा घटना वाढणार आहेत. हॅरिस सुलतानने आपल्या ट्विटमध्ये व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमाव मारहाण करताना दिसत आहे.

Pakistan Army
Jammu Kashmir : धक्कादायक! पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला! ५ ते ६ किलो IEDसह एकाला अटक

हॅरिस सुलतान यांनी लिहिले की, प्राथमिक माहितीनुसार, मौलाना निगार आलम असे मृताचे नाव आहे. त्यांनी या घटनेवर टीका करत पुढे म्हटले की, पाकिस्तानमध्ये साधं वक्तव्य देखील तुमचा जीव घेऊ शकते. येणाऱ्या काळात, कोणीही मुहम्मद किंवा इतर पैगंबरांचा उल्लेख 'निंदनीय' मानला जाईल या भीतीने करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.