कोरोनावर बूस्टर डोसचा प्रभावसुद्धा कमी होण्याची शक्यता मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बन्सल यांनी व्यक्त केली.
वॉशिंग्टन -कोरोनाविरुद्धच्या (Corona) लढ्यात आतापर्यंत लसीकरणाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र आता नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली असताना बूस्टर डोस (Booster Dose) देण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे असताना कोरोनावर बूस्टर डोसचा प्रभावही पुढच्या काही महिन्यात कमी होण्याची शक्यता मॉडर्नाचे (Moderna) सीईओ स्टिफन बन्सल (Stefen Bancel) यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, बूस्टर डोसचा प्रभाव पुढच्या काही महिन्यात कमी होईल आणि २०२२ च्या शेवटी लोकांना आणखी एक डोस देण्याची गरज भासेल. स्टीफन बन्सल हे गुरुवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिअंट हा वेगाने पसरणारा असून यामुळे अनेक देशांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. बन्सल यांनी म्हटलं की, ओमिक्रॉनवर प्रभावी ठरावी अशा पद्धतीच्या लसीवर सध्या कंपनी काम करत आहे. पण ही लस येण्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागेल. मला वाटतं की २०२२ च्या शेवटी आणि त्यानंतरही बूस्टर डोस घ्यावे लागतील.
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी चौथ्या बूस्टर डोसबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, चौथा डोस दिल्यास शरिरातील अँटिबॉडीजमध्ये पाचपट वाढतात. यावरच मॉडर्नाचे सीईओ सचिन बन्सल यांनी प्रतिक्रिया दिली.
अमेरिकेला पुन्हा फटका
भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज एक लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे. जगभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे २५ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत दिवसभरात ७ लाख नवे रुग्ण आढळले असून १८०० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात फ्रान्समध्ये ३ लाख ३२ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गुरुवारी दिवसभरात ब्रिटनमध्ये २ लाख ४९ हजार नवे रुग्ण सापडले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.