मोदी-जिनिपिंग वाद मिटविण्यास सक्षम; व्लादिमीर पुतीन यांची स्पष्टोक्ती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग हे दोन्ही जबाबदार नेते असून उभय देशांतील वाद मिटविण्यासाठी ते सक्षम आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे.
Vladimir Putin
Vladimir PutinSakal
Updated on

सेंट पिट्सबर्ग - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग (Shi Jinping) हे दोन्ही जबाबदार नेते असून उभय देशांतील वाद (Dispute) मिटविण्यासाठी ते सक्षम आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेत अन्य शक्तीने हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Modi Able to Erase Jinping Controversy Vladimir Putin)

‘पीटीआय’शी दुभाषीच्या मदतीने डिजिटल संवाद साधताना पुतीन बोलत होते. अमेरिका, भारत, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यासह जगातील काही प्रमुख वृत्तसंस्थेच्या निवडक संपादकांशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. यात अमेरिका-रशिया संबंध, कोरोना संसर्ग, रशियाविरुद्ध अमेरिकेचे निर्बंध, गाझा पट्टीवरील संघर्ष आदी मुद्द्यांचा समावेश होता. चार देशांचा क्वाड समूह (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) यावर रशियाने टीका केलेली असताना पुतीन यांनी म्हटले की, कोणत्या देशाने कोठे सामील व्हावे आणि त्याने अन्य देशांसमवेत किती मर्यादेपर्यंत संबंध ठेवावेत यावर लक्ष ठेवण्याचे काम मॉस्कोचे नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध तसेच मॉस्को आणि बीजिंग यांच्यातील संबंधात कोणताही विरोधाभास नाही. भारत आणि चीन यांच्या संबंधात काही मुद्द्यावरून तणाव असल्याची आपल्याला जाणीव आहे. परंतु शेजारील देशाशी अशा प्रकारचे मुद्दे नेहमीच असतात. भारताचे पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांचा स्वभाव आपल्याला ठावूक आहेत. ते खूपच जबाबदार लोक आहेत आणि ते परस्परांशी संयमाने आणि सन्मानाने काम करतात. एखादा वाद निर्माण झाला तर ते त्यावर तोडगा काढतील, याचा मला विश्‍वास आहे. परंतु या क्षेत्रात अन्य कोणत्याही शक्तीने हस्तक्षेप करू नये, असे वाटते.

Vladimir Putin
कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?

रशिया आणि चीन यांची वाढती जवळीकता ही भारत आणि रशियाच्या संरक्षण सहकार्यावर परिणाम करणारी ठरेल काय? यावर पुतीन म्हणाले की, भारत आणि रशिया यांच्यातील संबंध खूपच वेगाने आणि यशस्वीरीत्या वृद्धींगत होत आहेत आणि या संबंधाचा आधार हा ‘विश्‍वास’ आहे.

गटाचा उद्देश ‘टार्गेट’ करणारा नसावा

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह यांनी क्वाडचा ‘आशियायी नाटो’ अशा शब्दात टीका केली होती. या गटात भारत असल्याबद्दल पुतीन म्हणाले, आम्ही क्वाडमध्ये सहभागी होणार नाही आणि अन्य देश सहभागी का झाला, याचा श्‍लेष काढण्याचे काम आमचे नाही. कोणत्या देशाने कोणाबरोबर जावे आणि किती मर्यादेपर्यंत संबंध वाढवावेत, याचा प्रत्येक सार्वभौम देशाला अधिकार आहे. आमचे म्हणणे एवढेच की कोणताही करार किंवा सहकार्य करण्याचा उद्देश हा अन्य देशाला टार्गेट करण्यासाठी केला जाऊ नये, अजिबातच नाही.

भारतासमवेतचे संबंध खूपच दृढ असून त्याचा आधार परस्पर विश्‍वास आहे. आम्ही विशेषत: भारतातच अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एकत्र काम करत आहे. या अर्थाने भारत हा रशियाचा एकमेव भागीदार देश आहे. आमचे सहकार्य एवढ्यावरच थांबत नसून ते सर्वंकष आहे. आमच्यात अर्थव्यवस्थेपासून ऊर्जा, तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रात व्यापक सहकार्य आहे.

- व्लादिमीर पुतीन, अध्यक्ष, रशिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.