अबुजा, (पीटीआय) : ‘‘दहशतवाद, फुटीरतावाद, चाचेगिरी आणि तस्करी ही भारत आणि नायजेरियासमोरील मोठी आव्हाने असून त्यांचा एकत्रितरित्या सामना केला जाईल. नायजेरियाबरोबरील धोरणात्मक भागीदारीला भारताच्या दृष्टीने मोठे महत्त्व आणि प्राधान्य आहे,’’असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याबरोबरही चर्चा केली.