Monkeypox : ९२ देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स; WHO चे महासंचालक लसीबद्दल म्हणाले...

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य प्राण्यांपासून होणारा आजार आहे
Monkeypox Spread News
Monkeypox Spread NewsMonkeypox Spread News
Updated on

Monkeypox Spread News कोरोनानंतर मंकीपॉक्सने (Monkeypox) लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मंकीपॉक्स आतापर्यंत ९२ देश आणि प्रदेशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत ३५ हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच १२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी दिली.

गेल्या आठवड्यात सुमारे ७,५०० प्रकरणे नोंदवली गेली. मागील आठवड्याच्या तुलनेत यात २० टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये जगातील ९२ पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सची ३५ हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे अशा देशांमध्ये आहेत जिथे मंकीपॉक्स यापूर्वी कधीही झालेला नाही.

Monkeypox Spread News
पडद्यावर आपसात भिडणार ‘हे’ मोठे चित्रपट; होऊ शकते निर्मात्यांचे नुकसान

मंकीपॉक्स (Monkeypox) रोखण्यासाठी (Spread) लस महत्त्वाची भूमिका बजावू शकते. बऱ्याच देशांमध्ये, प्रभावित समुदायांसाठी लसीची उच्च मागणी आहे. मंकीपॉक्स हा विषाणूजन्य प्राण्यांपासून होणारा आजार आहे. जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात. मंकीपॉक्स हा अनेक श्वसन संक्रमणांसारखा संसर्गजन्य नसला तरी प्रसार रोखणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले.

याचा प्रसार नियंत्रित करण्याचा एक मार्ग म्हणजे लसीकरण करणे. आमच्याकडे आधीच मंकीपॉक्सची लस आहे. परंतु, वाढते प्रकरण पाहता लसीची मागणी जगातील अनेक भागांमध्ये पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. ब्रिटिश आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरातील मंकीपॉक्सच्या घटनांमध्ये घट होण्याची चिन्हे आहेत. परंतु, ही घसरण सुरू राहील की नाही हे सांगणे खूप कठीण आहे.

निवेदनानुसार, जुलैमध्ये अधिकाऱ्यांचे मूल्यांकन असे होते की दर दोन आठवड्यांनी संक्रमितांची संख्या दुप्पट होईल. आतापर्यंत यूकेमध्ये ती हजारहून अधिक मंकीपॉक्स प्रकरणे आढळली आहेत. त्यापैकी ७० टक्के लंडनमधील आहेत. आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे, असे एजन्सीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.