Monkeypox Virus : मंकीपॉक्सचा धोका वाढला; स्पेनमध्ये मृत्यूची पहिली नोंद

स्पेनमध्ये प्रथमच एका व्यक्तीचा मंकीपॉक्स विषाणूमुळं मृत्यू झाल्याची नोंद झालीय.
Monkeypox Virus News
Monkeypox Virus Newsesakal
Updated on
Summary

स्पेनमध्ये प्रथमच एका व्यक्तीचा मंकीपॉक्स विषाणूमुळं मृत्यू झाल्याची नोंद झालीय.

Monkeypox Virus News : स्पेनमध्ये (Spain) शुक्रवारी प्रथमच एका व्यक्तीचा मंकीपॉक्स विषाणूमुळं (Monkeypox Virus) मृत्यू झाल्याची नोंद झालीय. युरोपमधील (Europe) मंकीपॉक्सच्या उद्रेकाशी संबंधित हा पहिला मृत्यू असल्याचं मानलं जातंय. स्पॅनिश आरोग्य मंत्रालयाच्या (Spanish Ministry of Health) आपत्कालीन आणि दक्षता समन्वय केंद्राच्या मते, मंकीपॉक्सनं सर्वाधिक प्रभावित झालेल्या जगातील काही देशांपैकी स्पेन एक आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत सुमारे 4,298 लोकांना या विषाणूची लागण झालीय.

केंद्राच्या एका अहवालात म्हटलंय की, मंकीपॉक्सच्या 3,750 रूग्णांपैकी 120 रूग्ण रुग्णालयात दाखल होते आणि या मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळं एका रूग्णाचा मृत्यू झालाय. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला नसल्यानं मृत्यूच्या विशिष्ट कारणाबाबत कोणतीही माहिती देता येणार नाहीय.'

Monkeypox Virus News
राज्यपाल, पंतप्रधान आणि आता राष्ट्रपती? अधीर रंजन चौधरींनी याआधीही केली आहेत 'वादग्रस्त' विधानं

जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization WHO) मंकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलाय. डब्ल्यूएचओच्या मते, मे महिन्याच्या सुरुवातीपासून जगभरात मंकीपॉक्सची 18,000 हून अधिक प्रकरणं आढळून आली आहेत. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी बुधवारी सांगितलं की, 78 देशांमध्ये ही प्रकरणं आढळून आली आहेत. यामध्ये 70 टक्के प्रकरणं युरोपमध्ये, तर 25 टक्के अमेरिकेत आढळून आली आहेत.

Monkeypox Virus News
Rishi Sunak : ब्रिटनचा पंतप्रधान झालो, तर जनतेला करात देणार सूट; ऋषि सुनक यांची मोठी घोषणा

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची 4 प्रकरणं आढळून आली आहेत. यापैकी एक प्रकरण 24 जुलै रोजी दिल्लीत समोर आलं होतं. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांना 21 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.