Pakistan : 'हे' आहे पाकिस्तानातलं सगळ्यात महागडं घर; मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'ला देतंय टक्कर

Pakistan : 'हे' आहे पाकिस्तानातलं सगळ्यात महागडं घर; मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'ला देतंय टक्कर
Updated on

Pakistan Most Expensive Home : पाकिस्ताला भलेही भिकेचे डोहाळे लागले असतील परंतु देशाकडे अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्या भव्यतेमुळे ते अनेकांना मागे टाकतात. पाकिस्तानातल्या सगळ्यात महागड्या घराबद्दल जाणून घेऊयात.

पाकिस्तानातलं हे सगळ्यात महागडं घर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊसलासुद्धा टक्कर देत आहे. हे घर बघून राजा महाराजांच्या श्रीमंतीची अनुभूती येईल. पाकिस्तानातल्या इस्लामाबाद येथील गुलबर्ग या भागात अनेक अलिशान महल आणि हवेली आहेत. भव्य इमारती आणि अलिशान घरांसाठी गुलबर्ग हे फेमस आहे.

Pakistan : 'हे' आहे पाकिस्तानातलं सगळ्यात महागडं घर; मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'ला देतंय टक्कर
Pune Porsche Accident: रक्त मीच दिलं होतं.. अल्पवयीन मुलाच्या आईची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, सांगितलं कारण

किती आहे किंमत?

या घराच्या भव्यतेचा अंदाज लावला तर या घरासाठी जे गार्डन आहे ते संपूर्ण शहरात जेवढे बगिचे आहेत, त्यापेक्षा जास्त भव्यतेचं आहे. या घरामध्ये स्वीमिंग पूल, जिम, थिएटर, लाऊंज एरिया आणि एका मोठ्या गॅरेजसह १० बेडरुम आणि १० मोठे बाथरुम आहेत. विशेष म्हणजे मुघली बांधकामं आणि आधुनिकता याचा अनोखा संगम त्यात ठेवण्यात आलेला आहे.

Pakistan : 'हे' आहे पाकिस्तानातलं सगळ्यात महागडं घर; मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'ला देतंय टक्कर
Congress Exit Poll: काँग्रेस अध्यक्षांनी सांगितला 'एक्झिट पोल'; इंडिया आघाडीला मिळणार 'इतक्या' जागा

भारतातलं सगळ्यात महागडं घर

भारतातलं सगळ्यात महागडं घर हे मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे आहे. अँटिलियामध्ये २७ मजले आहेत. ज्यात जिम, मुव्ही थिएटर आणि स्वीमिंग पूल; अशा सुविधा आहेत. या घराची किंमत १५ हजार कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.