World’s Expensive Places : कोविड काळात आरोग्याचे नुकसान तर झालेच पण त्याबरोबरच आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. कोरोना महामारी आणि रूस यूक्रेनच्या युद्धामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे सावट उभे राहीले. त्यामुळे मागल्या एक वर्षाच्या काळाज जग पातळीवर महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये राहाणे महागडे झाले आहे. तेव्हा आज आपण जगातील सर्वाधिक महागडे देश कोणते आणि त्यात आपल्या भारताचा क्रमांक कितवा ते जाणून घेणार आहोत.
जगातील महागड्या देशांच्या टॉप लिस्टमध्ये बरमूडाचे नाव पहिले आहे. हा जगातील सगळ्यात महागडा देश आहे. त्यानंतर येतो स्वित्झरलँड. स्वित्झरलँड हे एक फेमस टूरिस्ट डेस्टिनेशनही आहे.
केमॅन आयलँड महागाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बारबाडोस हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सगळ्यात महागडा देश आहे.
नॉर्वे देशाचे नाव या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. तर सिंगापूर हा देश सातव्या क्रमांकावर आहे.
जगाच्या यादीत आठव्या क्रमांकाचा देश येतो तो आइसलँड. डेनमार्क हा महागाईच्या बाबतीत नवव्या क्रमांकावर आहे.
लिस्टमधअये दहाव्या क्रमांकावर इजराइल या देशाचे नाव आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की या यादीत आपल्या भारताचे नाव कुठे आहे. तर भारत देश हा महागाईच्या यादीत 138 व्या क्रमांकावर आहे. भारतात आजूबाजूच्या देशातलेसुद्धा बरेच लोक राहातात. नेपाल, चीन आणि आणखी बऱ्याच देशातील लोक भारताच्या कानाकोपऱ्यांत पसरलेले तुम्हाला दिसून येतील. (world)
तर भारतातीतल बरेच नागरीक शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने जपान, युनायटेड नेशन्स आणि मलेशिया यांसारख्या देशांमध्ये राहाताय. भारत देश राहाण्याच्या सोयीने तसेच इतर अनेक गोष्टींसाठीही मध्यम दर्जाचे महागडे आहे. त्यामुळे भारताचा क्रमांक या यादीत 138 व्या स्थानावर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.