आईनं जुळ्यांना दिला जन्म, पण दोन भिन्न वर्षात असणार वाढदिवस

केवळ पंधरा मिनिटांच्या फरकानं या बहिण-भावाचा जन्म झाला
Alfredo_Aylin
Alfredo_Aylin
Updated on

कॅलिफोर्निया : अमेरिकेत (USA) एका महिलेन जुळ्यांना जन्म दिला केवळ पंधरा मिनिटांच्या फरकानं त्यांचा दोन वेगळ्या दिवसांना आणि वर्षामध्ये जन्म झाला. ही जुळी २० लाख बालकांमध्ये एकमेव ठरली आहेत. कॅलिफोर्नियातील (California) एका रुग्णालयात ही घटना घडली. (Mother gave birth to twins but birthdays will be in two different years)

Alfredo_Aylin
पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर

फातिमा माद्रिगल असं या महिलेचं नाव असून तिच्या अल्फ्रेड नावाच्या मुलाचा जन्म ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री ११.४५ मिनिटांनी झाला तर आयलिन नावाच्या मुलीचा जन्म अल्फ्रेडच्या जन्मानंतर पंधरा मिनिटांनी म्हणजेच मध्यरात्री १२ वाजता म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी झाला. नातिविदाद मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी या जुळ्या भावंडांचा फोटो शेअर करत म्हटलं की, अमेरिकेत दरवर्षी १,२०,००० मुलांचा जन्म होतो. पण जुळी भावंड ती देखील दोन वेगळ्या दिवशी जन्माला येणं ही खूपच दुर्मिळ घटना असते. अशा घटना या एक किंवा दोन मिलियन मुलांच्या जन्मापैकी एखादीच असते.

Alfredo_Aylin
पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर

फातिमा माद्रिगल आणि रॉबर्ट ट्रुजिलो या जोडप्याला आधीच तीन मुलं आहेत. यांपैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यात आता ही जुळी मुलं झाली आहेत. या जुळ्या भावंडांमध्ये एक मुलगा तर एक मुलगी आहे.

Alfredo_Aylin
'भयंकर', BulliBai वरून महिला आयोगानं दिल्ली पोलिसांना सुनावलं

यापूर्वी, अशाच प्रकारे ३१ डिसेंबर २०१९ एक दुर्मिळ डिलिव्हरी झाली होती. यामध्ये डॉन गिलिअम या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला होता. यांपैकी एकाच जन्म ३१ डिसेंबर रोजी ११.३७ तर दुसऱ्या बाळाचा जन्म १ जानेवारी २०२० रोजी मध्यरात्री १२.०७ वाजता झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.