पाकिस्तानातील (Pakistan) सिंध प्रांतातील धान्या बाजारात हिंदू व्यापारी सुनील कुमार (वय ४४) यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या (Murder of a Hindu businessman) केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण (atmosphere of fear among the citizens) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर शहर बंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील धान्य मार्केटमध्ये एका हिंदू व्यापाऱ्याची काही लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यात व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर काही स्थानिक लोकांनी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले.
सुनील कुमार यांच्यावरील हल्ला हा पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदू, अहमदिया आणि ख्रिश्चनांवर सतत होणाऱ्या अत्याचाराचे आणखी एक उदाहरण (Minorities insecure) आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले वाढले आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण न केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर अनेकदा टीकाही केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.