म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास

म्यानमारमध्ये लष्करी राजवट असून वर्षभरापूर्वी इथलं लोकशाही सरकार उलथवून टाकत लष्करानं सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती.
The questions of Rohingyas should have been handled properly says Syu Kyi
The questions of Rohingyas should have been handled properly says Syu Kyi
Updated on

रंगून : म्यानमारच्या माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आन सांग सू की (Aan San Syu Ki) यांना आणखी चार वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण, इथल्या एका कोर्टांन त्यांच्यावर बेकायदा पद्धतीनं वॉकी-टॉकी आयात करणे आणि त्याचा वापर करणे तसेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानं आणखी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण संयुक्त राष्ट्रे (UN), युरोपीयन संघ (EU) आणि यूके (UK) सरकारसहित अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी या शिक्षेची निंदा केली आहे. (Myanmar democratic leader Suu Kyi sentenced to four more years in prison)

The questions of Rohingyas should have been handled properly says Syu Kyi
PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; स्वतंत्र समितीद्वारे होणार चौकशी

वृत्तसंस्था एएफपीच्या माहितीनुसार, सू की यांच्यावर वॉकी-टॉकी बाळगल्याचा आरोप त्यावेळी लावण्यात आला होता, जेव्हा सैनिकांनी १ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचं लोकशाही सरकार उलथवून लावत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्याचवेळी त्यांनी सू की यांच्या घरावर छापा मारला यावेळी हे प्रतिबंधित उपकरण जप्त करण्यात आलं होत.

अज्ञातस्थळी आहे लोकशाहीवादी नेत्या

लोकशाहीवादी नेत्या सू की यांना ६ डिसेंबर रोजी इतर दोन आरोप लावण्यात आले होते. यामध्ये कोविडच्या निर्बंधांचं उल्लंघन तसेच लोकांना याचं उल्लंघन करण्यास भाग पाडल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. त्यामुळं त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर लष्करी राजवटीच्या प्रमुखांनी त्यांची अर्धी शिक्षा कमी केली. पण त्यांना लष्करानं एका अज्ञातस्थळी ठेवलं आहे. सरकारी टीव्हीच्या वृत्तानुसार, आन सांग सू की या आपली पुढची शिक्षा देखील याच ठिकाणी भोगतील.

सू की यांच्यावर भ्रष्टाचारासह अनेक गंभीर आरोप

आंग सान सू की यांच्यावर भ्रष्टाचारासह कोविडच्या निर्बंधांचं उल्लंघन, दूरसंचार कायदा यांसह अनेक आरोप लावले आहेत. मात्र, सू की यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. म्यानमारच्या कोर्टानं दिलेल्या या शिक्षेचा संयुक्त राष्ट्रे, युरोपीयन संघ आणि यूके सरकारसहित अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी याची निंदा केली आहे. हा खटला राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()