कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?

कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?
Updated on

नवी दिल्ली : असं म्हटलं जातं की हे जग अनेक प्रकारची रहस्ये आणि गूढकथांनी भरलेलं आहे. आणि याचा प्रत्यय वारंवार यावा, अशा काही घटना या जगात सातत्याने घडताना दिसून येतात. ही रहस्ये उलगडण्यामध्ये काहीवेळा शास्त्रज्ञांना यश येतं मात्र, काही घटना अशा असतात, ज्या आपल्या डोकं हलवून सोडतात. अशीच काहीशी एक घटना कजाकिस्तानमधील कालाची गावामध्ये घडली होती. जाणून घेऊया काय आहे ही रहस्यमयी घटना... (Mystery of Kazakh Sleepy Hollow Villagers who fell asleep for days at a time and suffered hallucinations)

या गावाला 'स्लीपी हॉलो' नावाने देखील ओळखलं जातं. याचं कारण असं आहे की, या गावामध्ये जर कुणी व्यक्ती झोपलं तर तो जवळपास सहा दिवस झोपतून उठतच नाही. कदाचित हे वाचून आपल्याला हसू आलं असेल अथवा आपल्याला ही चेष्टा वाटत असेल मात्र, हे अगदी खरं आहे. हां, हे मात्र खरंय की गावातील सगळ्यांनाच या झोपण्याची बाधा झालीय असं नाहीये मात्र, या गावात असे अनेक लोक आहेत जे कुठेही आणि कधीही अचानकपणे झोपतात आणि नंतर कितीही उठवलं तरी उठत नाहीत.

कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?
भारताच्या गुप्ता बंधूंची संपत्ती दक्षिण आफ्रिकानं केली सील

या गावातील या गूढ रहस्याबाबत अनेक मोठमोठे संशोधक शोध घेतायत की असं नेमकं कशामुळे घडतंय? मात्र, अद्याप हे असं का घडतंय याबाबत नेमकं कारण समोर येऊ शकलं नाहीये. या गावातील लोक याप्रकारे झोपतात त्यामागील कारण एक आजार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, तरिही या बाबीला काही ठोस प्रमाण उपलब्ध होऊ शकलं नाहीये. या गावातील ज्या लोकांना हा रोग झाला आहे ते अचानकच कुठेही झोपून जातात. मग ते घरात असो वा घराबाहेर असोत. या गावात जवळपास 600 लोक राहतात आणि त्यातील जवळपास 14 टक्के लोक या आजाराने बाधित झाले आहेत. त्या लोकांना देखील हे समजत नाहीये की त्यांच्यासोबत असं नेमकं का होतंय? हे लोक भररस्त्यातच उभं राहून झोपून जातात आणि त्यानंतर जवळपास सहा दिवसांपर्यंत त्याच अवस्थेत झोपू शकतात. उठल्यानंतर त्यांनाच हे आठवत नाही की आपण नेमकं कधी आणि कसं काय झोपी गेलो.

कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?
फेसबुकने वाचवले दिल्लीतील तरुणाचे प्राण; लाइव्ह आत्महत्या करण्याचा होता प्रयत्न

या गावातील या रहस्यमयी प्रकाराची पहिली घटना 2010 साली समोर आली होती. शाळेतील काही मुले अचानकच बेशुद्ध होऊन झोपी गेली. त्यानंतर गावातील अनेक इतर लोक देखील याच प्रकाराला बळी पडले. संशोधकांनी घेतलेल्या शोधानुसार, हे लोक या रोगाने पीडित होण्यामागचं कारण आहे त्या ठिकाणचं दुषित पाणी. कारण या गावात काही काळापूर्वीच एक युरेनियनची खाण होती जी आता बंद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही या गावातील या लोकांसोबत हा जो प्रकार घडतो आहे, तो आश्चर्यचकीत करणारा आहे आणि याबाबतचा शोध अजूनही घेतला जातोय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.