Namibia's drought crisis Over 700 wild animals to be killed for food
जगभरात नामिबियाची ओखळ ही समृद्ध वन्यजीव असलेला देश अशी आहे. त्यामुळेच इथे जगभरातील पर्यटकही येत असतात, परंतु आता याच वन्य प्राण्यांची हत्या करण्याची वेळ येथील सरकरावर आली आहे. नामिबिया सध्या प्रचंड दुष्काळाचा सामना करतोय आणि दक्षिण आफ्रिकन देशांतील जवळपास १४ कोटी लोकांना अन्नही मिळत नाही. यामुळेच येथील सरकारने ७२३ वन्य प्राण्यांना मारून अन्नाचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.
''हे करणे गरजेचं आहे आणि आमची नैसर्गिक संसाधने नामिबियाच्या नागरिकांच्या फायद्यासाठी वापरण्याचे आमच्या संवैधानिक आदेशात आहे," असे देशाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने २६ ऑगस्ट रोजी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील दुष्काळग्रस्त भागात नामिबियाचा समावेश आहे आणि यापूर्वी २०१३, २०१६ व २०१९ मध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी दुष्काळामुळे त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती, परंतु सध्याचा दुष्काळ व्यापक आणि विनाशकारी आहे, असे नामिबियातील जागतिक वन्यजीव निधीचे संचालक ज्युलियन झेडलर यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये बोत्सवानामध्ये दुष्काळाची सुरुवात झाली आणि त्यानंतर अंगोला, झाम्बिया, झिम्बाब्वे आणि नामिबियापर्यंत तो पसरला व तीव्र झाला. याचा दक्षिण आफ्रिकेच्या बहुतेक भागावर परिणाम झाला, असे युरोपियन कमिशनच्या अहवालात म्हटले आहे.
एल निनो आणि जगातील अनेक भागांमधील तीव्र उष्णता व दुष्काळ यामुळे येथील परिस्थिती एवढी वाईट झाली आहे. सात वर्षांनतर २०२३ मध्ये एल निनो पुन्हा आला आणि ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात सरासरीपेक्षा तापमान जास्त झाले आणि पर्जन्यवृष्टी कमी झाली. त्यामुळे जमिनीतील आर्द्रतेत तीव्र कमतरता आणि वनस्पतींवर ताण निर्माण झाला, परिणामी दुष्काळ पडला.
नामिबियाला वन्य प्राण्यांना फक्त मासांसाठी मारायचे नाही. पण, सरकारला भीती वाटते की दुष्काळामुळे प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात स्थलांतरित होतील, ज्यामुळे त्यांचा मानवांशी संघर्ष होऊ शकतो. देशात २४,००० हत्तींसह वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे, ही जगातील सर्वात मोठी वन्य प्राण्यांची संख्या आहे. पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाच्या निवेदनात असेही म्हटले आहे, की काही प्राण्यांच्या कत्तलीमुळे वन्यजीवांवर दुष्काळाचा परिणाम कमी होईल.
नाही. जगभरात विविध प्रजातींची शिकार ही अन्नासाठी, खेळ म्हणून किंवा ट्रॉफीसाठी केली जाते. . झेब्रा, ब्लू विल्डबीस्ट आणि इंफालासारखे प्राणी हे नामिबियातील cull यादीत येतात आणि सामान्यतः दक्षिण आफ्रिकन प्रदेशातील लोक त्यांची अन्नासाठी शिकार करतात, असे NYT अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.