Modi Video : मोदींच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा; बंगळूरु, अहमदाबादमध्ये दूतावास सुरु करणार

PM Narendra Modi Video
PM Narendra Modi Videoesakal
Updated on

नवी दिल्लीः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. अमेरिका बंगळूरु आणि अहमदाबाद येथे दूतावास सुरु करणार आहे. तर भारत सिएटलमध्ये दूतावास सुरु करेल.

व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. व्हाईट हाऊसमध्ये ते जो बायडेन यांच्यासोबत डिनर घेणार आहेत. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अमेरिका बंगळूरु आणि अहमदाबादमध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास सुरु करणार आहे. तर भारत परस्पर संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी सिएटलमध्ये दूतावास सुरु करेल.

PM Narendra Modi Video
Covid Scam : हद्द झाली! मृतदेहांच्या बॉडीबॅग खरेदीत घोटाळा? बोगस डॉक्टर अन् बोगस कर्मचारी...

व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांसाठी १ लाख २५ हजार व्हिसा जारी केले. भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिका महत्त्वाचं ठिकाण ठरत असून वर्षभरात विद्यार्थ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, झिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. धूम स्टिडिओच्या कलाकारांनी हे सादरीकरण केलं.

PM Narendra Modi Video
विरोधकांच्या बैठकीपूर्वी शाहांनी घोषित केला काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार, विरोधकांमध्ये फूट पडणार?

दरम्यान, पंतप्रधानांसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डिनरमध्ये राष्ट्रध्यक्षांचं आवडते मेन्यू आहेत. यात आईस्क्रिम आणि पास्ता असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एनएसए अजित डोभाल हेदेखील सहभागी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.