अमेरिकेनं मोदींना दिल्या भारताच्या अतिप्राचीन 157 कलाकृती

अमेरिकेनं मोदींना दिल्या भारताच्या अतिप्राचीन 157 कलाकृती
Updated on

पंतप्रधान नरेंद मोदी यांना अमेरिका दौऱ्यात एक अमूल्य भेट मिळाली. तब्बल सात हजार वर्षांपूर्वीच्या १५७ कलाकृती अमेरिकेने मोदींकडे सुपूर्द केल्या आहेत. या कलाकृती परत केल्याबद्दल भारताने अमेरिकेचे आभार मानले आहेत. हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांचा वारसा सांगणाऱ्या अतिप्राचीन मूर्तीचा या कलाकृतींमध्ये समावेश आहे. यातील काही मूर्ती हिंदू देवदेवतांच्या असून काही भगवान गौतम बुद्धाच्याही आहेत. दगड, धातू आणि भाजलेल्या मातींपासून त्यांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावरुन आज, रविवारी परत येणार आहेत. या दौऱ्यात त्यांना अमेरिकन सरकारने भारताच्या प्राचीन १५७ कलाकृती परत मिळाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, यापैकी अनेक वस्तू 11 व्या ते 14 व्या शतकातील आहेत. मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण जगाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या प्राचीन कलाकृती आणि वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये अनेक नक्षीकाम केलेल्या वस्तूंसह नटराजाच्या मूर्तीचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 157 भारतीय पुरातन वस्तू अमेरिका सरकारने भारताला परत केल्या. भारतातील पुरातन काळातील अनेक मूर्तीचा समावेश आहे.

पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा आज संपला आहे. मोदींचा हा दौरा अनेक कारणामुळे चर्चेत राहिला. या दौऱ्यात मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भेट घेतली. त्याशिवाय क्वाडच्या बैठकीला हजेरी लावली. चीन-पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराही दिला. तसेच तेथील अनेक उद्योगपतींसोबतही बैठक झाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()