मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुध्ये अनेक भारतीय विद्यार्थी व नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. तसेच रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी बुधवारी (ता. २) रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (vladimir putin) यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करीत युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषत: खारकिव्हमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत त्यांच्यासंदर्भात चर्चा केली. तसेच युक्रेनमधील संघर्षग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली.
दोन दिवसांत दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याने भारतात मोठी नाराजी पसरली आहे. केंद्र सरकारवर ताशेरेही ओढले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यापूर्वीही मोदी (narendra modi) यांनी पुतीन यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी युद्धावर चर्चा केली गेली होती. युक्रेन आणि रशिया यांनी आपसात बोलून तोडगा काढण्याचे नरेद्र मोदी हे पुतीन (vladimir putin) यांना म्हटले होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारकडून ‘ऑपरेश गंगा’ अभियान राबविले जात आहे. याअंतर्गद युद्धग्रस्त युक्रेनमध्ये विमान पाठवून भारतीयांना परत आणले जात आहे. धोका वाढल्यानेच भारतीय दूतावासाने (Embassy) बुधवारी नवीन ॲडव्हायझरी जारी केली. यामध्ये युक्रेनचे दुसरे सर्वांत मोठे शहर खारकिव्ह येथे राहणाऱ्या भारतीयांना तात्काळ शहर सोडण्यास सांगितले होते.
हजारो भारतीय अडकलेले
युक्रेन (ukraine) आणि रशियामध्ये सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा पार पडली. परंतु, युद्धावर पूर्णविराम लागत नाही. युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. आता त्यांनी रशियाचे (russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पुन्हा फोनवर चर्चा केली.
धोका वाढला
आजच युक्रेनमध्ये रशियाचा वाढलेला धोका पाहता खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी करण्यात आली. यामध्ये स्वत:च्या सुरक्षेसाठी तात्काळ खारकिव्ह सोडण्यात आवाहन करण्यात आले होते. वाहने मिळत नसल्याच पायदळ जाण्याचेही यात सांगण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.