नासानं पुढे ढकलली चांद्रमोहिम; बेझोस, मस्क ठरले कारणीभूत!

नासाने नवी डेडलाईन केली निश्चित
NASA Lunar Mission
NASA Lunar Mission
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं (नासा) आपली बहुप्रतिक्षित चांद्रमोहिम पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अमेरिकन नागरिकांना चंद्रावर पाठवण्याची ही मोहिमाची मुदत एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही मोहिम २०२४ मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी त्यांनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बोझोस आणि अॅलन मस्क कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

NASA Lunar Mission
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड संख्येत वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

या वर्षाच्या सुरुवातीला फ्लोरिडाचे माजी सिनेटर आणि राष्ट्रपती जो बायडन यांच्याद्वारे नियुक्ती करण्यात आलेले नासाचे प्रशासक बिल नेस्लन म्हणाले, "नासाच्या चांद्रमोहिमेला उशीर होऊ शकतो. मून लँडरवरुन जेफ बोझेस यांच्या ब्लू ओरिजिनसोबत सुरु असलेला खटला आणि स्पेसेक्ससोबत नासाच्या कॅप्सूल ओरियनच्या निर्मितीला उशीर होणं याला त्यांनी यासाठी जबाबदार धरलं आहे.

NASA Lunar Mission
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल; शुक्रवारी होणार शस्त्रक्रिया?

नेल्सन म्हणाले, स्पेसेक्सोबतच्या कामात आम्ही सुमारे सात महिने वाया घालवले आहेत. यामुळं या मोहिमेला सन २०२५ पूर्वी लॉन्च केल जाऊ शकत नाही. आम्हाला स्पेसेक्ससोबत विस्तृत चर्चा करावी लागेल. त्यामुळं आम्हाला स्पष्ट डेडलाईन निश्चित करता येईल. डिसेंबर २०२२ मध्ये गेल्या अंतराळ यात्रेकरुकडून चंद्रावर पाऊल टाकण्याला ५० वर्षे पूर्ण होतील. सन १९७२ मध्ये अपोलो १७ ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर नासाने दुसऱ्या लक्ष्यांवर ध्यान केंद्रीत केलं आहे. परंतू अधूनमधून चांद्र मोहिमेवर चर्चा होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()