Chandrayaan 3 : अमेरिकेची 'नासा'ही भारताच्या 'चांद्रयान' लँडिंग सोहळ्याचं करणार थेट प्रक्षेपण

उद्या संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भारताचं यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
Chandrayaan 3 Update
Chandrayaan 3 UpdateeSakal
Updated on

NASA TV: भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेतील यानाचं उद्या चंद्रावर लँडिंग होत आहे. याकडं संपूर्ण जगाचं लक्ष आहे. त्याचमुळं अमेरिकेची अंतराळ संसोधन संस्था नासानं देखील हा सोहळा लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नासा टीव्हीवरुन याचं थेट प्रक्षेपण होणार आहे. (NASA TV will also telecast soft landing of Chandrayaan 3 tomorrow)

भारताच्या या महत्वाकांक्षी योजनेला रशियानं देखील सदिच्छा दिल्या आहेत. रशियानं आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, आम्ही उद्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत. उद्या याला मोठं यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. (Latest Marathi News)

Chandrayaan 3 Update
World Archery Championship: आदिती स्वामीची ऐतिहासिक कामगिरी! भारतानं पहिल्यांदाच जिंकल 'गोल्ड'

दरम्यान, चंद्रावर आत्तापर्यंत अमेरिका, रशिया, चीन यांच्यासह भारतानं स्वारी केली आहे. पण दक्षिण ध्रुवावर यांपैकी अद्याप एकाही देशाचं यान पोहोचू शकलेलं नाही. नुकतीच रशियाची लुना २५ यानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडं झेपावलं होतं, पण त्यांच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होऊ शकलं नाही ते कोसळलं. (Marathi Tajya Batmya)

पण आता भारताच्या विक्रम लँडरकडं सर्वांच्या नजरा आहेत. जर लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.