NSA Ajit Doval:मुस्लिम वर्ल्ड लीगचे महासचिव आणि सौदी अरेबियाचे पूर्व न्याय मंत्री मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा भारताच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (दि.११ जुलै) इस्लामिक कल्चर सेंटरमध्यील एका कार्यक्रमात अल-ईसा यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते.
डोभाल या कार्यक्रमात म्हणाले की दहशताद कोणत्याही धर्माशी निगडीत नाहीये. अशातच अध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांचे कर्तव्य आहे की हिसेंचा मार्ग निवडणाऱ्या लोकांना काऊंटर केलं पाहिजे.
कार्यक्रमाच्या दरम्यान धार्मिक नेते, जाणकार आणि राजदूतांना संबोधित करताना अजित डोवाल म्हणाले की,"दहशतवाद कोणत्याही धर्माशी निगडीत नाहीये. ते तर माणसं असतात, ज्यांना भरकटवलं जातंय. अशावेळी अध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांचे कर्तव्य आहे की दहशतवादाची वाट निवडणाऱ्यांना प्रभावीपणे सामना केला पाहिजे. तो कोणत्याही धर्माचा, विश्वासाचा किंवा राजकीय विचारधारेचा असू शकतो."
जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा उल्लेख करत अजित डोभाल म्हणाले की, "देशाच्या सीमेलगत, सीमेबाहेरील सुरक्षा आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी भारत त्या संघटनेविद्धच्या लढाईचे नेतृत्व करत आहे, जे देश उग्रवाद, अंमलीपदार्थ आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत."
भारतात कोणताच धर्म धोक्यात नाही: अजित डोभाल
कार्यक्रमात डोवाल हेही म्हणाले की भारतात कोणताही धर्म धोक्यात नाहीये. भारतामधील सर्वसमावेशक लोकशाही आपल्या सर्व नागरिकांना त्यांची धार्मिक, जातीय किंवा सांस्कृतीक पार्श्वभूमीचा विचार न करता त्यांचा सन्मान करण्यात यशस्वी झाली आहे.
पुढे ते म्हणाले की, " एक गौरवशाली देश म्हणून भारत आव्हानांचा सामना करण्यासाठी सहिष्णूता, संवाद आणि सहकार्य करण्यात विश्वास ठेवतो. हा केवळ योगायोग नाहीये की २० कोटी मुस्लिम लोकसंख्या असूनही वैश्विक दहशतवादात भारतीय नागरिकांचा सहभाग अत्यंत कमी आहे."
मक्का येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा उल्लेख
१९७९मध्ये सौदी अरबियामध्ये मक्का येथील ग्रॅंड मस्जिद येथे झालेल्या दहशतवादाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की या घटनेने कशा प्रकारे दहशतवादाबाबत सौदी अरेबिया देशाचा दृष्टीकोन बदलला. या हल्लामुळे दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. ज्यामुळे सौदी अरेबिया देशाला आपल्या सुरक्षा यंत्रणा आणि आपल्या परराष्ट्र धोरणाचं पूनर्मूल्यांकन करावं लागलं.
२० नोव्हेंबर १९७९ला इस्लाम धर्मातील पवित्र धार्मिक ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मक्कामध्ये जगभरातून मुस्लिम बांधव जमले होते. सकाळची नमाज संपताच मशीदीत आधीपासून उपस्थित असणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांनी लोकांना ओलीस ठेवलं. या दहशतवाद्यांनी लोकांना १४ दिवसांपर्यंत बंदुकीचा धाक दाखवतं ओलीस कैद करुन ठेवलं होतं. सौदी अरेबियाच्या शासनाला दहशतवाद्यांच्या विरोधात लष्करी कारवाई करावी लागली होती.
फ्रान्स आणि पाकिस्तानने देखील सौदी अरेबियामध्ये आपल्या कमांडो टीम पाठवल्या होत्या. १४ दिवसांच्या लष्करी कारवाईनंतर ४ डिसेंबरला ही लढाई संपली. या लष्करी कारवाईमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आणि जिवंत वाचलेल्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं.
मक्कामधील ग्रॅंड मस्जिदवर कब्जा करणारे सर्व दहशतवादी अल-जमा-सलाफिया अल-मुहतासिबा (जेएसएम) या संघनेशी संबंधित होते. जेएसएम संघटना सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या आधुनिकीकरणाला विरोध करत होते. या संघटनेचे म्हणणे होते की सौदीमध्ये सामाजिक आणि धार्मिक पतन होत आहे.
सौदी सरकारने ६३ लोकांना अटक करत ९ जानेवारी १९८०ला सार्वजनिकरित्या मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. असं मानलं जात की लष्करी कारवाईनंतर सौदी अरेबियाचा चेहरामोहरा बदलला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.