नेपाळ : भारताचे नवे राजदूत म्हणून नवीन श्रीवास्तवांची नियुक्ती

Naveen Srivastava
Naveen Srivastavaesakal
Updated on
Summary

नवीन श्रीवास्तव हे परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाचे प्रमुख आहेत.

नवीन श्रीवास्तव (Naveen Srivastava) यांची नेपाळमधील भारताचे पुढील 'राजदूत' म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. परराष्ट्र मंत्रालयानं आज (मंगळवार) सांगितलं की, नवीन श्रीवास्तव सध्या परराष्ट्र मंत्रालयात (Ministry of External Affairs) अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांची नेपाळमधील (Nepal) भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. श्रीवास्तव हे 1993 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारीही आहेत. श्रीवास्तव लवकरच आपला कार्यभार स्वीकारू शकतात. चीनला (China) सामोरे जाण्यासाठी भारतानं हे महत्वाचं पाऊल उचललंय.

नवीन श्रीवास्तव हे परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाचे प्रमुख आहेत. 2020 पासून सुरू असलेल्या अडथळ्याच्या बाबतीत चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) मुत्सद्दी आणि लष्करी चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. या संवादामुळं चीनला आपलं सैन्य मागं घ्यावं लागलंय.

Naveen Srivastava
ICC ची मोठी कारवाई; दक्षिण आफ्रिकेच्या 'या' क्रिकेटपटूवर घातली 9 महिन्यांची बंदी

16 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेपाळ भेटीदरम्यान नवीन श्रीवास्तव यांची नेपाळमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकृत निर्णय भारतानं घेतलाय. नवीन श्रीवास्तव विनय कवात्रा यांची जागा घेतील. नवीन श्रीवास्तव यांनी चीन, जपान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि मंगोलियाचे कामकाज पाहणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयातील पूर्व आशिया विभागाचे प्रमुखपद भूषवलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.