ॲन फ्रँकच्या स्मृतिस्थळात नाझी समर्थकांचा धुडगूस

ॲन फ्रँकच्या स्मृतिस्थळात नाझी समर्थकांचा धुडगूस
Updated on

बोइस (अमेरिका) -  ‘डायरी ऑफ ॲन फ्रँक’मुळे जगभरात परिचित असलेल्या ॲन फ्रँक हिच्या स्मृतीस्थळात काल रात्री नाझी समर्थकांनी घुसखोरी करत येथे सर्वत्र स्टिकर चिकटविले. समाजकंटकांनी स्मृतीस्थळावर सर्वत्र लावलेल्या स्टिकरवर नाझींचे चिन्ह असलेले उलटे स्वस्तिक आणि ‘आम्ही सर्वत्र आहोत’ असे लिहिलेले होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१९४२ मध्ये हिटलरच्या नाझी सैन्याने नेदरलँडवर केलेल्या आक्रमणानंतर त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ज्यू वंशीय ॲन फ्रँकचे कुटुंब ॲमस्टरडॅम येथील एका छुप्या खोलीत लपून बसले होते. जवळपास ७०० दिवस ते येथे होते. या काळात किशोरवयीन असलेल्या ॲन हिने तिला वाढदिवसाला मिळालेल्या डायरीत खिडकीतून दिसणाऱ्या घटनांची नोंद करून ठेवली होती. हे कुटुंब नाझी सैन्याच्या हाती पडून नंतर त्यांची छळछावणीत रवानगी झाली आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, ॲनच्या मृत्यूनंतर तिची ही डायरी प्रसिद्ध झाली होती. यामुळेच तिचे नाव जगभरात माहिती झाले. तिच्या धाडसाची दखल म्हणून अमेरिकेतील बोइस येथे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. आज सकाळी या स्मृतिस्थळात सर्वत्र नाझी समर्थकांनी स्टिकर्स लावलेले आढळले. या समाजकंटकांनी तोडफोड केली नसली तरी स्टिकरमध्ये बरेच विद्रुपीकरण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही गुन्ह्याची नोंद केलेली नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.