Nepal Earthquake : विनाशकारी भूकंपात नेपाळ उद्ध्वस्त; तब्बल 128 जणांचा मृत्यू, भारतातही जाणवले जोरदार धक्के

शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला.
Nepal Earthquake Updates
Nepal Earthquake Updatesesakal
Updated on
Summary

दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.

Nepal Earthquake Updates : शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. रात्री 70 जणांनी आपले प्राण गमावले होते. आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

तसेच दीडशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. रुकुम पश्चिम इथं 36 तर जाजरकोटमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे. रुकुम पश्चिमचे डीएसपी नामराज भट्टराई आणि जाजरकोट डीएसपी संतोष रोक्का यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीये.

शुक्रवारी रात्री 11.32 च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळं अनेक लोकांना घराबाहेर पडावं लागलं. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे 227 किमी उत्तरेस आणि काठमांडूपासून 331 किमी पश्चिम उत्तर-पश्चिम 10 किमी खोलीवर होता. नेपाळला महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे.

दरम्यान, दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले. उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना इथंही भूकंपाचे धक्के जाणवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.