Nepal News : नेपाळमध्ये स्थापन होणार नवं सरकार! प्रचंड तिसर्‍यांदा घेणार PM पदाची शपथ

nepal politics pushpa kamal dahal prachanda new prime minister of nepal
nepal politics pushpa kamal dahal prachanda new prime minister of nepal
Updated on

पुन्हा एकदा पुष्प कमल दहल 'प्रचंड' हेच नेपाळची सत्ता सांभाळणार आहेत. ते नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील आणि सोमवारी (26 डिसेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता ते तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली.

नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु नाट्यमय घडामोडींमध्ये, विरोधी सीपीएन-यूएमएल आणि इतर लहान पक्षांनी रविवारी (25 डिसेंबर) 'प्रचंड' यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आणि यासह, प्रचंड तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणे निश्चित झाले.

nepal politics pushpa kamal dahal prachanda new prime minister of nepal
Corona Outbreak : चीनमधून मायदेशी परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, घर केलं सील

नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांना लिहिलेल्या पत्रात प्रचंड यांनी म्हटले आहे की, त्यांना पंतप्रधानपदासाठी अपक्ष खासदारांसह 169 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी त्यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. उद्या ते पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

nepal politics pushpa kamal dahal prachanda new prime minister of nepal
Paragliding Accident : पॅराग्लायडिंग करताना 400 फूटाहून कोसळला, साताऱ्यातील पर्यटकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.