Free Sunscreen: ऊन वाढलं म्हणून सरकारचा मोठा निर्णय, सर्वांना वाटणार चक्क फुकट सनस्क्रीन...

या सरकारला नागरिकांच्या त्वचेची काळजी
sunscreen
sunscreenesakal
Updated on

त्वचेची काळजी घेण्यासाठी पहिले सनस्क्रीनची आठवण येते. पण फक्त उन्हाळ्यातच नाही तर हे प्रत्येक ऋतुत वापरले पाहिजे. बहुतांश सनस्क्री उन्हाळ्यातच वापरली जाते. दरम्यान, डच सरकारने आपल्या नागरिकांना मोफत सन प्रोटेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. (Netherlands To Provide Free Sunscreen To Its Citizens As Skin Cancer Cases Rise)

मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलँड सरकारला देशातील त्वचेच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण कमी करायचे आहे. यासाठी लोकांचे उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. नेदरलँड्समध्ये त्वचेच्या कॅन्सरच्या वाढत्या प्रकरणांना तोंड देण्यासाठी डच सरकारने आपल्या नागरिकांना मोफत सन प्रोटेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत डच सरकार उन्हाळ्यात शाळा, विद्यापीठे, पार्क्स, खुली सार्वजनिक ठिकाणे येथे मोफत सनस्क्रीन उपलब्ध करून देणार आहे. (Latest Marathi News)

sunscreen
Cleaning Viral News : म्हणून साफसफाई करायला हवी..! कुटुंबाला घर साफसफाईत हाती लागलं घबाड...

सरकारच्या या मोहिमेनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला सनस्क्रीन लावण्याची सवय लागेल, त्यामुळे देशातील घातक आजारांची व त्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी होईल. अशी प्रतिक्रिया डच अधिकाऱ्याने दिली आहे. (Latest Marathi News)

माहितीनुसार, ही कल्पना एका क्लिनिकच्या स्किन डॉक्टरची आहे, असे एका डच अधिकाऱ्याने सरकारच्या या योजनेबद्दल बोलताना नमूद केले. ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळात मोफत सॅनिटायझर दिल्यानंतर लोकांना त्याची सवय झाली, त्याचवरून त्या डॉक्टरला ही कल्पना सुचली. अशा परिस्थितीत लोकांना मोफत सनस्क्रीन दिल्यास काही काळानंतर त्यांनाही ते वापरण्याती सवय होईल, असा विचार करून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

sunscreen
India-China Relations : आता शत्रुत्व वर्तमानपत्रापर्यंत ! वाजपेयींच्या काळातले भारत – चीनचे वृत्तपत्रीय संबंध रसातळाला

यासोबतच मुलांना लहानपणापासूनच सनस्क्रीन लावण्यास उद्युक्त करावे म्हणजे त्यांना त्याची सवय लागेल, असे अधिकारी सांगतात. ‘ या योजनेसाठी थोडा खर्च होत आहे, पण या (सनस्क्रीन वाटपाची) ही मोहीम आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असल्याचे, अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.